Home क्राईम तो फोन… आणि कोंबडबाजारात जुगाऱ्यांची ‘पळापळ’

तो फोन… आणि कोंबडबाजारात जुगाऱ्यांची ‘पळापळ’

● अवैद्य धंद्याला परवानगी कोणाची ? ● मरेगावातच का चाललंय हा उपद्व्याप

2116
C1 20231101 06322594

अवैद्य धंद्याला परवानगी कोणाची ?
मरेगावातच का चाललंय हा उपद्व्याप

Crime News Wani | मारेगाव पोलीस ठाणे पुर्णतः निष्क्रिय व अनागोंदीने माजलेले आहे. सत्ताधारी लोकप्रतिनिधीला मारण्यापर्यंत ठाणेदाराची मजल जात असेल तर नेमकी ‘गोम’ काय हा संशोधनाचा विषय आहे. तालुक्यात पूर्वापार चालणारे सर्व अवैद्य धंदे आता बिनधास्त चाललेय. मंगळवारी दुपारी साडेचार वाजता कोंबडबाजार चालवणाऱ्याला एक फोन आला आणि बिनधास्त चालणारा भरगच्च कोंबड बाजार तात्पुरता बंद झाला, जुगाऱ्यांची पळापळ झाली हा सर्व प्रकार पोलीस प्रशासनाच्या मूक संमतीने होतोय हे आता सिद्ध होत आहे. The operator of the kombad bazar received a call and the bustling kombad bazar was temporarily shut down.

काही दिवसांपुर्वी मारेगांवात चोरट्यांनी धुमाकूळ घातला होता. एकाच दिवशी तब्बल 14 ते 15 घरे चोरट्यानी फोडली होती. यामुळे मारेगांवकर नागरीक भयभीत झाले होते. याबाबत आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी ठाणेदारांना धारेवर धरत ताबडतोब चोरट्यांच्या मुसक्‍या आवळण्याच्या सूचना दिल्या होत्या. सोबतच संपुर्ण अवैद्य धंदे बंद करावे असे ठाणेदार जनार्दन खंडेराव यांना ठणकावले होते.

मारेगाव तालुका अवैद्य धंद्याचे माहेरघर झाले आहे, कोंबड बाजाराने चांगलेच थैमान घातले आहे. गोदणी शिवारातील जंगलसदृष्य भागात बिनधास्तपणे चालणारा कोंबड बाजार परिसरातील नागरिकांना, शेतकऱ्यांना अक्षरशः आर्थिकदृष्ट्या लुबाडणारा आहे. “अवैद्यधंदे आपल्या दारी” हा नवीन उपक्रम जोर धरताना दिसत आहे. 

उपविभागातील जंगलव्‍याप्‍त भाग कोंबड बाजारासाठी ‘सेफ’ ठिकाण समजल्‍या जाते. मारेगांव तालुक्‍यातील  विविध भागात कोंबड बाजार भविष्यात भरविण्यात येणारच हे मारेगाव पोलिसांच्या सध्यस्थीतील कार्यप्रणाली वरून दिसत आहे. ठाणेदार खंडेराव यांच्यावर चाललेल्या चौकशी दरम्यानच गोदनी शिवारातील निशानघाट येथे मंगळवारी जंगी कोंबड बाजार भरतो. पाच झुंजी रंगतात आणि कोणाचा तरी फोन येतो आणि पळापळ होते.

आ. बोदकुरवार यांनी उपविभागात अवैद्यधंदे खपवून घेणार नाही अशी गर्जना केली होती. उप विभागातील अवैद्यधंदे तसेच मारेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत चालणारा कोंबड बाजार व अवैद्य व्यवसाय बंद होणार की नाही हे स्पष्ट करावे, त्या प्रमाणेच मटका, जुगार,  कोंबड बाजार, अवैध दारू विक्री, गोवंश तस्‍करीचे समूळ उच्चाटन व्हावे, अन्यथा “अवैद्य व्यावसायिकांना मोकळं रान आणि सर्वसामान्यांना दंडुके शाहीचा मान” हेच भविष्यात घडणार आहे.
Rokhthok News