Home क्राईम murder : तरुणावर झाडली गोळी, उपचारादरम्यान मृत्यू

murder : तरुणावर झाडली गोळी, उपचारादरम्यान मृत्यू

● संतप्त जमावाने आरोपीची दुचाकी जाळली ● वाहनाचा कट लागल्याचे क्षुल्लक कारण

3563
C1 20240207 10132911
Img 20240613 Wa0015

संतप्त जमावाने आरोपीची दुचाकी जाळली
वाहनाचा कट लागल्याचे क्षुल्लक कारण

Crime News Yavatmal : यवतमाळ शहर गुन्हेगारीचे केंद्रस्थान बनले आहे. क्षुल्लक वादातून हत्या होत आहे. वाहनाचा ‘कट’ लागल्याच्या कारणावरून देशी कट्ट्यातून गोळी झाडून तरूणांची हत्या करण्यात आली. ही गंभीर घटना मंगळवार दिनांक 6 फेब्रुवारी ला रात्री 9 वाजता घडली. A youth was killed by firing a bullet from a country gun because of a vehicle being ‘cut’

शादाब खान रफीक खान रा. तायडे नगर असे मृतकाचे नाव आहे. तर मनिष सागर शेंद्रे राहणार सेजल रेसिडेंसी, अंबिका नगर यवतमाळ असे आरोपीचे नाव आहे. घटनेच्या दिवशी आरोपी मनिष हा मैत्रिणी सह R.T.O. कार्यालय चौकातून जात असताना मृतक शादाब खान रफीक खान यास वाहनाचा कट लागला. त्यामुळे आरोपी व मृतक यांच्या मध्ये वाद झाला.

C1 20240207 10211108
आरोपीची दुचाकी जाळली

वादावादी नंतर आरोपी मनीष स्वतःच्या घरी गेला व देशी कट्टा घेउन परत कळंब चौक परिसरात आला. तर त्याची मैत्रीण सुद्धा तेथे पोहचली. यावेळी आरोपीने “तू मला व माझा मैत्रीणीला शिवीगाळ का केली” असा मृतक यास जाब विचारला. तेव्हा मृतक व आरोपी यांचेमध्ये पुन्हा वाद झाला. आरोपी मनिष शेंद्रे याने त्याचे जवळच्या देशी कट्ट्यातून मृतक याचेवर गोळी झाडली.

या घटनेत शादाब खान याचे छातीत गोळी लागली. तेथे जमलेल्या प्रत्यक्षदर्शींनी जखमीला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी हलवले. मात्र उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. तर घटनास्थळी संतप्त जमावाने आरोपीची दुचाकी जाळली.

घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. पवन बन्सोड, अप्पर पोलीस अधिक्षक पियूष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार, स्थानिक गुन्हे शाखेचे आधारसिंग सोनोने, अवधूतवाडीचे ठाणेदार ज्ञानोबा देवकते, शहरचे ठाणेदार सतिश चवरे यांनी घटनास्थळ गाठले. शहरात अनुचित प्रकार घडु नये म्हणून दंगल नियंत्रण सुरक्षा पथकाला पाचारण करण्यात आले होते. या प्रकरणी गुन्हा दाखल होण्याची प्रक्रीया रात्री उशिरा पर्यंत सुरु होती.
Rokhthok News

C1 20240529 15445424
Previous articleAccident : महिला घटनास्थळीच ठार
Next articleLCB ने आवळल्‍या रेती तस्‍करांच्‍या मुसक्‍या
Rokhthok News
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.