● पोलीस प्रशासन On action mode
● भंडारा जिल्हा मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध
Crime News : अवैद्य व्यवसायाशी संलग्न तसेच ‘लॅन्ड डेव्हलपर’ म्हणून झपाट्याने उदयास आलेल्या जमीर खान ऊर्फ जम्मू याच्यावर महाराष्ट्र धोकादायक क्रियाकलाप प्रतिबंधक अधिनियम (MPDA) अन्वये कारवाई करण्यात आली. त्याला दिनांक 9 जूनला ताब्यात घेत भंडारा जिल्हा मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. He has been lodged in Bhandara District Central Jail.
शहरात MPDA कायद्याअंतर्गत करण्यात आलेली ही पहिलीच कारवाई आहे. झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले, औषध द्रव्यांशी संबंधित गुन्हेगार, आणि धोकादायक व्यक्तींवर नजर ठेवत, अशा गुन्हेगारांना रोखण्यासाठी अधिनियम 1981 म्हणजेच एमपीडीए (महाराष्ट्र प्रोहिबिशन ऑफ डेंजरस अॅक्टिव्हिटी) हा कायदा प्रभावी आहे. या कायद्यानुसार व्यक्तीला जास्तीत जास्त एक वर्षासाठी कारागृहात ठेवता येते.
जमीर खान विरोधात वणी पोलीस ठाण्यात विविध प्रकारचे गंभीर गुन्हे नोंद आहेत. तो परिसरातील शांततेस गंभीर धोका निर्माण करत असल्यामुळे त्याच्यावर एम.पी.डी.ए. (MPDA) कायद्यांतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव वणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर यांनी सादर केला होता. सदर प्रस्तावास जिल्हादंडाधिकारी यवतमाळ यांनी 9 जून रोजी मंजुरी दिली. त्यानंतर पोलीस पथकाने जम्मू खानला तातडीने ताब्यात घेतले.
शहरात अशा स्वरुपाचे शांतता भंग करणारे, शरीराविरुध्द व संपत्तीविरुध्द गुन्हे करणारे, धोकादायक गुन्हेगार तसेच वाळु तस्करी, गावठी हातभट्टी दारु विषयक गुन्हेगारांविरुध्द एम.पी.डी.ए कायद्यांतर्गत जास्तीत जास्त कारवाई करण्यात येणार आहे. अशा गुन्हेगारांची जंत्री गोळा करणे सुरु असुन भविष्यात अशा प्रकारच्या जास्तीत जास्त कारवाई प्रस्तावीत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली वणी पोलीस ठाण्याचे निरीक्षक गोपाल उंबरकर आणि PSI धीरज गुल्हाणे यांनी केली.
ROKHTHOK NEWS






