Home Breaking News आणि…त्‍याने मृत्‍यूला कवटाळले

आणि…त्‍याने मृत्‍यूला कवटाळले

● टोकाचे पाउल का उचलले हे अस्‍पष्‍ट

1823
Img 20250630 wa0035

टोकाचे पाउल का उचलले हे अस्‍पष्‍ट

Sad News Wani | तालुक्‍यातील कुंभारखणी येथे वास्‍तव्‍यास असलेल्‍या 42 वर्षीय व्‍यक्‍तीने आपल्‍या राहत्‍या घरी विषारी औषध प्राशन करुन मृत्‍यूला कवटाळले. ही धक्‍कादायक घटना बुधवार दिनांक 9 ऑगष्‍टला सकाळी घडली. A 42-year-old resident of Kumbharkhani died after ingesting poisonous medicine at his residence.

Img 20250630 wa0037

विजय शंकर गौरकार (42) असे मृत व्‍यक्‍तीचे नांव आहे. ते कुंभारखणी येथील निवासी होते, त्‍यांनी बुधवारी पहाटे मोनोसील नामक विषारी औषध प्राशन केले. ही बाब घरच्‍या मंडळीना कळतात त्‍यांना तातडीने वणी येथील ग्रामीण रुग्‍णांलयात हलविण्‍यात आले असता डॉक्‍टरांनी तपासणीअंती मृत घोषीत केले.

Img 20250103 Wa0009

विजय यांनी टोकाचे पाउल का उचलले हे अद्याप स्‍पष्‍ट होवू शकले नाही. त्‍यांचे पश्‍चात पत्‍नी, मुलगा व मुलगी आणि मोठा आप्‍तस्‍वकीय परिवार आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करताहेत. उत्‍तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांना सोपविण्‍यात येणार आहे.
Rokhthok News