Home Breaking News युवकाने शेतात जाऊन केले विष प्राशन

युवकाने शेतात जाऊन केले विष प्राशन

744
C1 20240404 14205351

मृतक सेवानगर परिसरातील

रोखठोक | शहरातील सेवा नगर परिसरात वास्तव्यास असलेल्या 35 वर्षीय तरुणाने शेतात जाऊन विष प्राशन केले. ही घटना बुधवार दि.11 जानेवारीला सकाळी उजागर झाली.

संतोष ज्ञानेश्वर खेडेकर (35) असे मृतक तरुणाचे नाव आहे. तो येथील सेवानगर परिसरात वास्तव्यास होता. घटनेच्या दिवशी तो सकाळी आपल्या वडगाव शिवारातील शेतात गेला आणि त्याने विषारी द्रव प्राशन केले. ही बाब आजूबाजूच्या शेतकऱ्यांना कळताच त्याला तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी रुग्णालय प्रशासनाने पोलिसांना सूचित केले असून शव विच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांना सोपविण्यात येणार आहे. त्याने आत्महत्या का केली हे अद्याप स्पष्ट झाले नाही.
वणी: बातमीदार