Home Breaking News खळबळ…..तत्कालीन मुख्याधिकारी, नगराध्यक्षासह 24 नगरसेवकांवर गुन्हे दाखल

खळबळ…..तत्कालीन मुख्याधिकारी, नगराध्यक्षासह 24 नगरसेवकांवर गुन्हे दाखल

3489

● न्यायालयाच्या आदेशाने कारवाई

रोखठोक |:- वणी नगर परिषदेने घेतलेल्या ठरावाविरोधात सामाजिक कार्यकर्ता रवींद्र कांबळे यांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने गुन्हे नोंद करून चौकशीचे आदेश दिले होते. पोलिसांनी दि 15 डिसेंबर ला तत्कालीन मुख्याधिकारी, नगराध्यक्ष व 24 नगरसेवकांवर गुन्हे नोंद केले आहे.

वणी नगर परिषदेने 26 फेब्रुवारी 2018 रोजी सर्वसाधारण सभेचे आयोजन केले होते. या सभेच्या सूचनापत्रात पाच विषयांवरचे ठराव पारित करण्याबाबत चर्चा करण्याचे नमूद केले होते. परंतु नंतर ही सभा रद्द करून 3 मार्च रोजी वणी नगर परिषदेच्या सभागृहात घेतली.

26 फेब्रुवारी रोजी आयोजित सभेत पाच विषयांवरील ठराव पारित होणार होते. परंतु 3 मार्चच्या सभेत दोन विषय अतिरिक्त टाकण्यात आले. त्यानंतर रवींद्र कांबळे यांनी रीतसर अर्ज करून सभेच्या कामकाजाच्या व त्या अनुषंगाने पारित केलेल्या ठरावाची प्रमाणित प्रत मागितली होती. त्यात ठराव क्रमांक 3 व 7 पारित करताना कायदेशीर तरतुदीचे उल्लंघन झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले होते.

या प्रकरणी त्यांनी वणीच्या प्रथम श्रेणी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायाधीश सुधीर बोमीडवार यांनी गुन्हे नोंद करण्याचे आदेश दिले होते. त्यावरून वणी पोलिसांनी तत्कालीन मुख्याधिकारी संदीप बोरकर, नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, उपाध्यक्ष श्रीकांत पोटदुखे, नितीन चहाणकर, वर्षा खुसपुरे, संतोष डंभारे, मंजुषा झाडे, धनराज भोंगळे, प्रीती बिडकर, राकेश बुग्गेवार, संगीता भंडारी, मनीषा लोणारे, प्रशांत निमकर, ममता अवताडे, आरती वांढरे, शहानूरबी अ गफ्फार, पांडुरंग टोंगे, अक्षता चौहान, विजय मेश्राम, माया ढुरके, स्वाती खरवडे, संतोष पारखी, रंजना उईके, शुभाष वाघाडकर, महादेव खाडे, धीरज पाते यांचेवर गुन्हे नोंद केले आहे. लोकप्रतिनिधींवर झालेल्या या कारवाईमुळे चांगलीच खळबळ उडाली आहे.
वणी: बातमीदार