Home क्राईम शहरातील अवैद्य धंदयावर ठाणेदारांचा ‘वॉच’

शहरातील अवैद्य धंदयावर ठाणेदारांचा ‘वॉच’

● ठिक ठिकाणी लावलेत फिक्‍स पॉईंट

1337

ठिक ठिकाणी लावलेत फिक्‍स पॉईंट

Police Administration News | वणी पोलीस स्‍टेशन हददीतील अवैद्य धंदयाचे समुळ उच्‍चाटण करण्‍याचा विडा पोलीस प्रशासनाने उचलला की काय असे वाटायला लागले आहे. शहरातील मटका अड्डयावर फिक्‍स पॉईंट लावण्‍यात आल्‍याने अवैद्य व्‍यवसायीकात चांगलीच धास्‍ती निर्माण झाली आहे. तसेच गस्‍त वाढविण्‍यात आल्‍याने काही प्रमाणात गुन्ह्यांचा आलेख कमी होतांना दिसत आहे. Fix points have been set up at the Matka haunts in the city.

वणी पोलीस ठाण्‍याला जिल्‍हयात वेगळेच स्‍थान आहे, हेवी वेट पोलीस ठाणे म्‍हणुन संपुर्ण राज्‍यात ओळख निर्माण झाली आहे. येथे येणारा अधिकारी चांगलाच मुत्‍सदी व प्रशासनात दबदबा असणारा असतो असे बोलल्‍या जाते. काही महिन्‍यांपुर्वी मेरीटचा आधार घेत ठाणे मिळवणाऱ्या अधिकाऱ्यामुळे संपुर्ण पोलीस ठाणे ‘राम’भरोसे झाले होते.

वणी उपविभागाला व ठाण्‍याला सध्‍यस्थितीत लाभलेले अधिकारी कनखर व कठोर असल्‍याचे प्रतित होत आहे. पोलीस कर्मचाऱ्यांना सुध्‍दा स्‍पष्‍ट ताकीद देत अवैद्य धंदयावर आळा बसविण्‍याच्‍या सुचना देण्‍यात आल्‍या आहे. कोणत्‍याही बीट मध्‍ये अवैद्य धंदे फोफावू नये याकरीता संबधीत कर्मचाऱ्यांनी सजग रहावे असे आदेशीत करण्‍यात आले आहे.

वणी उपविभागात मटका, जुगार, गोवंश तस्‍करी, कोंबड बाजार, प्रतिबंधीत सुगंधीत तंबाखुची होणारी तस्‍करी त्‍या प्रमाणेच बनावट तंबाखुचा काळाबाजार, भंगार चोरी, कोळसा चोरी असे अनेक अवैद्य धंदे पुर्वापार चालत आलेले आहे. पोलीस प्रशासनाने ‘ढिल’ दिली तरच अवैद्य व्‍यवसाय फोफावत असल्‍याचे सकृतदर्शनी दिसते. माञ यासर्व अवैद्य धंदयावर आळा बसवायचा असेल तर अधिकाऱ्यांनी ‘खमक्‍या’ असावं लागतं आणि याची चुणूक सध्‍यातरी दिसत आहे.
Rokhthok News