Home Breaking News अखेर….त्या इसमाचा मृतदेह आढळला

अखेर….त्या इसमाचा मृतदेह आढळला

856
Img 20240613 Wa0015

4 तास चालले रेस्क्यू ऑपरेशन

देवीचा घट विसर्जित करण्यासाठी गेलेल्या 50 वर्षीय इसम नदीत शनिवारी वाहून गेला होता. यवतमाळ येथून NDRF चे पथक शोध मोहीम करिता घोन्सा येथे दाखल झाले होते. तब्बल 4 तासांनी त्या इसमाचा मृतदेह हाती लागला आहे.

राजू बोरकुटे असे विदर्भा नदीत वाहून गेलेल्या इसमाचे नाव आहे. तो घोन्सा येथे सालगडी म्हणून कामाला होता. शनिवार दि 16 ऑक्टोबरला अन्य काही लोकां सोबत गावा लगतच असलेल्या नदीत देवीचा घट विसर्जन करण्याकरिता दुपारी 2 वाजताचे दरम्यान गेला होता.

परतीच्या पावसाने विदर्भा नदी दुथडी भरून वाहत आहे. पाण्याचा अंदाज न आल्याने राजू वाहून गेला होता. गावकऱ्यांनी नदीपात्रात त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना यश आले नाही. याबाबत पोलीस व महसूल विभागाला माहिती देण्यात आली होती.

त्याचा शोध घेण्यासाठी महसूल विभागाने NDRF च्या पथकाला पाचारण केले होते. रविवारी सकाळी 9 वाजता NDRF च्या पथकाने “रेस्क्यू ऑपरेशन” सुरू केले होते. गावापासून अर्ध्या किमी अंतरावर दुपारी 1 वाजताचे सुमारास त्याचा मृतदेह हाती लागला आहे. त्याचे पाश्चात्य पत्नी, एक मुलगा व मुलगी असून घडलेल्या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.
घोंसा: प्रवीण नैताम

C1 20240529 15445424