Home वणी परिसर लोकार्पण सोहळा जलशुध्दीकरण सयंत्राचा, आणि बरसल्या जलधारा…!

लोकार्पण सोहळा जलशुध्दीकरण सयंत्राचा, आणि बरसल्या जलधारा…!

506
Img 20240613 Wa0015

● शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत पार पडला सोहळा

बऱ्याच वर्षाच्या दिर्घ प्रतिक्षेनंतर होत्याचं नव्हत करीत धो-धो बरसणारा निर्सग, काही दिवसाच्या उसंतीनंतर असा काही पुन्हा बरसेल, असं कुणाच्याही ध्यानी मनी नव्हत. नियोजित सोहळ्याची वेळ जवळ आलेली. सोहळ्याचा  “तो” नेमका योगायोगचं म्हणावा की काय, आणि घडलंही तसचं.”लोकार्पण सोहळा जलशुध्दीकरण सयंत्राचा- आणि बरसल्या जलधारा…!”

आदिवासी बहूल असलेल्या मारेगांव तालुक्याच्या पंचक्रोशीत वसलेल कोलगांव हे गांव, म्हणायला तसं वर्गलढ्याचा इतिहास लाभलेलं गांव. मात्र, अलिकडच्या काळात राजकिय पटलावर चिंध्या-चिंध्या झालेलं. आणि विकास कामा साठी कोसो दुर ‘पल्याड’ गेललं गावं, अशीच काहीशी या गावाची झालेली ओळख.

म्हणायलाच श्रीमंतांच्या वस्तीचं गांव, मात्र गावात ना धड रस्ते, ना नाल्या, ना सांड पाण्याची सोय. बघाव तिकडे खड्डेचं खड्डे आणि नुसतीचं गटारगंगा. ‘विकास’ नावाच्या बाळाने गावांत जन्मचं घेतला नाही की काय, अशीच काहीशी अवस्था. गांव तसं चांगल मात्र वेशीवर टांगल. या म्हणीला साजेशी गावाची झालेली गत. याला सर्वस्वी गावातील लोकप्रतिनिधीचे उदासीन धोरण जबाबदार असल्याचे गांवकरी बोलतात.

विकासाचे नावावर ग्रामस्थांनी बऱ्याच वर्षापासून याचं देही याचं डोळा, गावात कधीच विकास कामाचा सोहळाचं बघीतला नाही. यात बदल व्हावा असं अनेकांना मनापासून वाटायचे, याला मूर्त रूप आलेयं, ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत. निवडणुका पार पडल्यात, आणि सजग नेतृत्वाच्या पुढाकारात ग्रामस्थांनी, सामाजिक कार्यात सतत अग्रेसर राहिलेल्या आभिषा राजु निमसटकर यांना सरपंचपदी आरुढ करीत, सत्तेचे परिवर्तन घडविले,

जनतेला दिलेला शब्द पाळत नवनिर्वाचित लोकप्रतिनिधीही कामाला लागलेत. आणि बघता-बघता लोकांच्या सहभागाने विकास कामांना गती आली. रखडलेली कामे मार्गी लागायाला सरूवात झाली. आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या प्रयत्नातून गावात जिल्हा खनिज विकास प्रतिष्ठाण अंतर्गत नऊ लक्ष रुपयाच्या निधीतून जलशुध्दीकरण संयत्राचे निर्माण झाले.

लोकार्पण सोहळ्याला आ. संजीवरेड्ड़ी बोदकुरवार, जिल्हा परिषद सदस्य अनिल देरकर, सरपंच आभिषा राजु निमसटकर, ग्रामसेवक अनिल रामटेके यांचे उपस्थीतित पार पडला. यावेळी सामाजीक कार्यकर्ते संजय पारखी, राजु आवारी, चेतन आवारी, संतोष मेश्राम यांचेसह उपसरपंच प्रदीप वासाडे, ग्राम पंचायत सदस्य जया जुनगरी, रवीता अवताडे, रविंद्र आत्राम, गृरुदास घोटेकार यांचीही प्रामुख्याने उपस्थीती होती.

नेमक्या लोकार्पण सोहळ्याचे वेळी पावसाच्या सरी कोसळत असतांना देखील, गावातील मोठ्या संख्येने नागरिक सोहळ्यात सहभागी झाले होते. तर लक्षनीय संख्येने उपस्थीत असलेल्या महिलांमुळे सोहळ्याचा उत्साह द्विगुणीत झाला होता. 

कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी सामाजिक कार्यकर्ते  गंगाधर जुनगरी, सुधाकर उपरे, वामन धोंगडे, बंडू भोयर, सुनिल वासाडे, बाबाराव वासाडे, रामा गौरकार, अरुण बलकी, महादेव जीवतोडे, नाना भोंगळे, बापुजी आवारी, बंडू आत्राम, गजू ठवसे, तुळशीराम फरताडे, अरविंद नागरकार, दशरथ सोनटक्के, देवराव बलकी, बाबाराव खुसपुरे, मनोहर चीट्टलवार तसेचं पो.पा. अरुण निमसटकर यांचेसह ग्रा.पं. कर्मचारी राहुल पुनवटकर, मनोहर निमसटकर यांनी लोकार्पण सोहळ्याचे यशस्वीतेसाठी परीश्रम घेतले. तर सोहळ्याचे बहारदार सुत्रसंचालन पत्रकार राजु नीमसटकर यांनी केले.

मारेगाव: बातमीदार

C1 20240529 15445424