Home क्राईम धक्कादायक…मनोरुग्ण युवतीवर लादले मातृत्व ?

धक्कादायक…मनोरुग्ण युवतीवर लादले मातृत्व ?

1673

– मारेगावात ‘ती’च्या मागावर विकृत “गिधाडं”

मारेगाव : दीपक डोहणे: ‘ती’ बहुदा पंचवीस सव्वीसीतील. अक्राळविक्राळ केस, मळकटलेले कपडे, शहरातील संपूर्ण रस्ते सैरभैर फिरणारी मनोरुग्ण युवती. न बोलता केवळ हसतमुख चेहऱ्याने मारेगाव पालथे घालताहेत. ती मनोरुग्ण असतांना कुण्यातरी मानसिक विकृताने तिच्यावर मातृत्व लादले आहे. शहराच्या कुठल्याही कोपऱ्यात रात्र काढणाऱ्या या मनोरुग्ण युवतीवर आता  मानसिक विकृत मानवी गिधाडं ‘ती’ला पुन्हा ओरबडू पाहते आहे. समाजमन सुन्न करणारे हे वास्तव असतांना समाजसेवेच सुरक्षा कवच तिला लाभेल काय ? हा प्रश्न येथे मात्र अनुत्तरीत आहे.

मारेगावात मागील पंधरा दिवसापूर्वी पासून एक मनोरुग्ण युवती अर्थहीन भटकंती करते आहे. अगदी तरुण वयात तिच्यावर नको तो प्रसंग ओढावला आहे. तन, कुटुंब व समाजमनाचा ठाव नसलेल्या या युवतीचे शरीर आकार घेत असल्याचे दिसते आहे. अर्थात तिच्या पोटात अंकुराची वाढ होत आहे. ती कोण, कुठून आली या बाबत सर्वच अनभिज्ञ असतांना तिच्यावर आता मारेगावात नियतीच्या करड्या नजरा लागल्या आहे. शहरातील कानाकोपऱ्यात रात्र काढतांना मानवी विकृत मनाचे गिधाडं तिच्या पथ्यावर आहे. तिच्यावर कालपरवा ओरबडण्याचा प्रकार घडल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

परिणामी, शहर पालथे घालत  तीची उपाशतापाशी भटकंती सुरू आहे. अशा विदारक व संवेदनशील स्थितीत तिचे पुनर्वसन समाजमनांना आव्हान ठरू पाहते आहे. येणारा काळ तिच्या साठी मोठे संकट घेऊन येत असला तरी तिच्या पोटात वाढत असलेल्या अंकुराने, ज्याने तिला प्रतिकुल परिस्थिती आणून ठेवली त्यामुळे तिच्या काटेरी जीवनाचं रहस्य तूर्तास अधांतरी आहे. तिला जगण्याचं बळ आणि आव्हान पेलण्यास सामाजिक दातृत्व सरसावेल काय? हा प्रश्न येथे मात्र अनुत्तरीत असला तरी  येथे विकृत मनाची मानवी गिधाडं तिच्यावर पाळत ठेवून रात्रीचा काळोख कलंकीत करण्याच्या नियती फोफावत आहे एवढे मात्र खरे.