Home वणी परिसर भरधाव दुचाकीस्वाराने वृद्धास उडवीले

भरधाव दुचाकीस्वाराने वृद्धास उडवीले

422
Img 20240613 Wa0015

* पायदळ चालणेही झाले कठीण

मारेगाव (बोटोनी): राहुल आत्राम- सायंकाळच्या वेळेस नेहमीप्रमाणे रस्त्याने फिरत असताना एका  भरधाव दुचाकीस्वाराने 67 वर्षीय वृद्धास उडविल्याची घटना शुक्रवारी घडली. या अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीवर नागपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

मारेगाव येथील संभाजी नगरमध्ये वास्तव्यास असलेले रघुनाथ अर्जुन तुरारे (67) हे नेहमीप्रमाणे सायंकाळचे वेळेस काही मंडळीबरोबर वणी मार्गावर असलेल्या पेट्रोल पपंकडे फिरायला गेले होते. फिरून परत येत असतानाच मारेगाव जवळील संकल्प नगरीच्या फलकाजवळ वणीकडून  भरधाव येणाऱ्या स्प्लेण्डर प्लस क्रमांक  MH 29- K 0025 या वाहनाने तुरारे यांना मागून  धडक दिली.

अपघातात तुरारे यांच्या डोक्याला, डाव्या पायाच्या घोट्याला तसेच उजव्या पायाच्या पोटरीला गंभीर स्वरूपाचा मार लागलेला आहे. त्यांचे दोन्ही जबर दुखापत झाल्याने त्यांना नागपूर येथील न्यूरॉन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांचेवर उपचार सुरू आहे. या प्रकरणी तुरारे यांची मुलगी संध्या मनोज गडदे यांनी दुसऱ्या दिवशी मारेगाव पोलिसात रीतसर तक्रार दाखल केली आहे.