Home Breaking News ठाणेदार वैभव जाधव यांची नागपूर येथे बदली

ठाणेदार वैभव जाधव यांची नागपूर येथे बदली

1256

* रिक्त जागेवर कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता

वणी बातमीदार:- वणी पोलीस स्टेशन चे ठाणेदार वैभव जाधव यांची नागपूर येथे बदली झाली असून त्यांच्या जागेवर कोणाची नियुक्ती होणार याची उत्सुकता लागली आहे.

ठाणेदार वैभव जाधव हे वणी येथे रुजू होताच त्यांनी अवैध धंद्यावर लक्ष केंद्रित केले होते. खुलेआम सुरू असलेले मटका,जुगारावर त्यांनी प्रतिबंध लावला होता. तसेच चंद्रपूरला दारू तस्करी करणाऱ्यांच्या त्यांनी मुसक्या आवळल्या होत्या. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक गंभीर गुन्ह्याचा तपास करून छडा लावला होता. विनंती वरून नागपूर येथे बदली करण्यात आली आहे. वणी पोलीस स्टेशन मध्ये त्यांनी सर्वाधिक 30 महिन्यांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. आता त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर कुणाची वर्णी लागणार याची उत्सुकता लागली आहे.