● कृषी विद्यार्थ्याने दाखवले प्रात्यक्षिक
शेतकरी आता स्वत: शेतातल्या पिकांची नोंद सातबारा उताऱ्यावर करू शकणार आहेत. यासाठी कृषी आणि महसूल विभागानं संयुक्तपणे ई-पीक पाहणी नावाचा उपक्रम हाती घेतला आहे. ऑनलाईन पिक पाहणी कशी करावी याबाबत शेतकऱ्यांना कृषी विद्यार्थ्याने प्रात्यक्षिक करून दाखवले.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संलग्नित कृषी महाविद्यालय कोंघारा येथील कृषिदुत चतुर्थ वर्षाचा विद्यार्थी पियुष संजय पारखी या विद्यार्थ्याने रमेश बेहरे थेट यांच्या शेतात जाऊन मार्गदर्शन केले.
पेरवे भरते वेळी 7/12 सोबत बाळगावा तसेच चालू मोबाईल क्रमांक जवळ ठेवावा, शेतात जाऊनच नोंदणी करावी, कमी नेटवर्क असेल तिथून नोंदणी करू नये पिकाचा फोटो घेताना लोकेशन चालू करावे इत्यादी गोष्टींबाबत मार्गदर्शन करून प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले.
या कार्यक्रमाकरिता महाविद्यालयाचे प्राचार्य महेश राठोड, कार्यक्रम अधिकारी प्रा. विशाल भाकडे, विषय शिक्षक प्रा. दत्ता जाधव, प्रा. हेमंत वानखेडे, प्रा.अजय सोळंकी, प्रा. स्नेहल आत्राम . प्रा.पल्लवी येरगुडे प्रा.काजल माने यांचे मार्गदर्शन लाभले.
बातमीदार: मारेगाव