Home वणी परिसर लोकसाहित्याचे अभ्यासक डॉ खंदारे यांचे व्याख्यान

लोकसाहित्याचे अभ्यासक डॉ खंदारे यांचे व्याख्यान

291
Img 20241016 Wa0023
13 पासून बळीराजा व्याख्यानमालेला सुरुवात

शनिवार दि 13 नोव्हेंबर  पासून वणीत बळीराजा व्याख्यानमाला ला सुरूवात होत आहे. लोकसाहित्य व संस्कृती अभ्यासक डॉ साहेबराव खंदारे हे या  व्याख्यानमालेत प्रमुख व्याख्याते राहणार आहे. शहरातील वरोरा रोडवरील बाजोरिया लॉन येथे शनिवार व रविवार ही व्याख्यानमाला चालणार आहे. या व्याखानमाले विविध विषयांवर व्याख्यान, परिसंवाद, मुलाखत इत्यादी कार्यक्रमाची रेलचेल असणार आहे.

शनिवार दि. 13 नोव्हेंबर  ला संध्याकाळी 6.30 वा. ‘आधुनिक आणि शाश्वत विकास’ या विषयावरील व्याख्यानाने या व्याख्यानमालेला सुरुवात होणार आहे. या विषयावर डॉ खंदारे व आपले विचार व्यक्त करणार आहे.कार्यक्रमाचे उद्घाटन दिलीप पेचे यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी डॉ शांताराम ठाकरे असणार आहे.उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार, संजय पोटदुखे, डॉ किशोर व्यवहारे, तुषार अतकारे, डॉ सुमय्या शेख,डॉ अस्मिता थाटे,ऍड अमोल टोंगे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

रविवार दि.14 नोव्हेंबर ला दुपारी 1 वाजता डॉ साहेबराव खंदारे यांची प्रकट मुलाखत घेतली जाणार आहे.प्रा दिलीप चौधरी व मुक्त पत्रकार जयंत साठे हे संवाद साधणार आहे. संध्याकाळी 6.30 वाजता ‘परंपरा आणि शाश्वत विकास’ या विषयावर डॉ खंदारे यांच्या  व्याख्यानाने या व्याख्यानमालेची सांगता होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ श्रीकांत भगत हे राहणार असून अंबादास वागदरकर,पोलीस उपनिरीक्षक माया चाटसे,डॉ वैशाली गोफणे, गोसावी खोले, नवनाथ नगराळे,गजानन वाढई, संजीवनी माटे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

आयोजित व्याख्यानमालेला शहरातील तसेच परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येन उपस्थित राहावे असे आवाहन शिव महोत्सव समितीचे शहबुद्दीन अजाणी, डॉ. करमचंद राजपूत, कृष्णदेव विधाते, डॉ. सुनिल जुमनाके, डॉ अर्शद शाह, अशोक चौधरी, प्रा अनिल टोंगे, मोहन हरडे, जानू अजाणी, विलास शेरकी, संजय गोडे, सुरेंद्र घागे, रविंद्र आंबटकर, वसंत थेटे, अजय धोबे, संजय कालर, विजय दोडके, किसन कोरडे यांनी केले आहे.

वणी: बातमीदार