● 7 आरोपी अटकेत
● 3 क्विंटल मांस जप्त
वणी: बंदी असलेल्या गोवंश मांसाची विक्री शहरातील मोमीनपुरा परिसरात सुरू होती. याबाबत ठाणेदारांना गोपनीय माहिती मिळताच धाडसत्र अवलंबत 6 ठिकाणी कारवाई करण्यात आली. यावेळी 51 हजार 800 रुपये किमतीचे 3 क्विंटल 70 किलो गोमांस जप्त करत सात आरोपींना ताब्यात घेण्यात आले.
वणी परिसरातून आंध्रप्रदेश तथा तेलंगणात मोठया प्रमाणात गोवंशाची तस्करी होते. यावर आळा घालण्यासाठी वणी पोलिसांनी वेळोवेळी कारवाया केल्या आहेत मात्र गोवंश तस्कर नवनवीन क्लुप्त्या अवलंबत आपले मनसुबे पूर्णत्वास नेत आहे. तसेच शहरातील दीपक टॉकीज परिसर व मोमीनपुरा भागात घरून गोमांस विक्री होत असल्याचे उघड झाले आहे.
रविवार दि. 23 जानेवारीला मोमीनपुरा येथील काही घरातून गोमासांची विक्री सुरू असल्याची गोपनीय माहिती ठाणेदार शाम सोनटक्के यांना मिळाली. मोमीनपुरा येथील मो. नासिर अब्दुल रशीद (51), मो. अनिस अब्दुल रशीद कुरेशी (48), मो. कैसर अब्दुल अजीज कुरेशी (35), मो. पाशा अब्दुल अजीज कुरेशी (38), मो. एजाज अब्दुल अजीज कुरेशी (49), अब्दुल वासे अब्दुल वहिद (23), मो. ईस्तेयाक अब्दुल बहाब कुरेशी यांच्या घरी धाड टाकली असता गोमांस विक्री सुरू असल्याचे निदर्शनास आले.
ताब्यातील व्यक्तीकडून 51 हजार 800 रुपये किमतीचे 3 क्विंटल 70 किलो गोमांस जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील-भुजबळ, अप्पर पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे, उप विभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार, ठाणेदार पो.नि. श्याम सोनटक्के यांचे मार्गदर्शनात पीएसआय शिवाजी टिपूर्णे, पीएसआय प्रवीण हिरे, अशोक टेकाडे, विशाल गेडाम, शंकर चौधरी, हरींद्र भारती, अमोल अनेलवार, प्रगती काकडे, छाया उमरे यांनी केली.
वणी :बातमीदार