Home Breaking News Wani update…|| ‘आयजी’ च्या धाडसत्राने अवैद्य व्यावसायिकांत ‘हडकंप’

Wani update…|| ‘आयजी’ च्या धाडसत्राने अवैद्य व्यावसायिकांत ‘हडकंप’

1004
Img 20240930 Wa0028

साडेचार लाखाचा मुद्देमाल हस्तगत
सुगंधित तंबाखू बाबत पडताळणी सुरू

वणी: वणीत ‘आयजी’ च्या पथकाने शनिवारी दुपारी धाडसत्र अवलंबले. चार मटका अड्डयावर धाड टाकून 43 जुगाऱ्याना ताब्यात घेत 6 दुचाकी व मोबाईल संचासह 4 लाख 57 हजार 170 मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. तर प्रतिबंधित सुगंधित तंबाखू बाबत संबंधित विभागाला सूचित करण्यात आले. या धडाकेबाज कारवाईने अवैद्य व्यावसायिकांत ‘हडकंप’ माजला आहे.

क्रीम पोलीस स्टेशन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वणी पोलीस हद्दीत अवैद्य व्यावसायिकांनी पुन्हा डोके वर काढल्याचे या धाडसत्राने अधोरेखित झाले आहे. मटका अड्डे व प्रतिबंधित सुगंधित तंबाखू ला ‘लक्ष्य’ करत पोलीस उप महानिरीक्षक चंद्रशेखर मीना यांच्या पथकाने सर्वप्रथम ‘रेकी’ करूनच धाडसत्र राबवले.

परिविक्षाधीन आयपीएस अधिकारी अचलपूर चे SDPO गोहर हसन यांच्या नेतृत्वातील पथकाने एकाच वेळेस शहरातील मटका अड्डे व प्रतिबंधित तंबाखू विक्रेत्यांना ‘टार्गेट’ केले. सिंधी कॉलनीतील दोन तंबाखू विक्रेत्यांवर कारवाई करून प्रतिबंधित तंबाखूचा मोठा साठा हस्तगत केला तर जुने बस स्थानक, दीपक चौपाटी व एकता नगर मधील दोन अशा चार मटका अड्डयावर धाडी टाकल्या.

मटका अड्डयावरील धाडसत्रात विनोद शिवरात्रीवार, राजू कुळसंगे, मनोज कामरे, गौतम झाडे, मंगेश राठोड, आकाश मेश्राम, गंगाधर शिंदे, सय्यद हमीद सय्यद कदिर, दिलीप चौधरी, शेख अहफाज शेख मुस्तफा, अश्फाक खान मेहबूब खान, सय्यद इरफान सय्यद उस्मान, रामराम निमजे, शेख खलील शेख हैदर, महादेव उपरे, रियाज खान जलील खान, राहुल उपलेंचवार, गोविंद कुमरे, सुधाकर गेडाम, महेश मोरे, पवनकुमार अवताडे, सय्यद मुश्ताक सय्यद रज्जाक, जीवन बावणे, राजा खान इरशाद खान, शेख मेहबूब शेख मन्सूर, शेख रहीम शेख मुस्तेहार, अश्फाक खान आबाज खान, अब्दुल रज्जाक शेख मुखत्यार, अब्दुल शब्बीर अब्दुल रेहमान, दिनेश भुसारी, अब्दूल हाफिज अब्दुल सत्तार, रितेश इभ्रतवार, हरिदास मडावी, राजेश गुप्ता, संतोष गायकवाड, अभय होले,मिनाज शेख व इझहार शेख यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पोलीस उप महानिरीक्षक चंद्रशेखर मीना यांच्या पथकाने वणी शहरात अवैद्य व्यवसायावर राबविलेल्या धाडसत्रामुळे शनिवारी चांगलीच खळबळ माजली. पथकाद्वारे रात्री उशिरा गुन्हा नोंद करण्यात आला असून प्रतिबंधित तंबाखू बाबत अन्न व औषध प्रशासनाला अवगत करण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या तंबाखू बाबतची पडताळणी झाल्यानंतर कारवाई केली जाणार आहे.
वणी: बातमीदार