Home वणी परिसर त्या… वक्तव्याने नाभिक समाज बांधव आक्रमक

त्या… वक्तव्याने नाभिक समाज बांधव आक्रमक

271

महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे निवेदन

वणी: केंद्रीय राज्यमंत्री तथा भाजपा चे माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी नाभिक समाजाबद्दल अपशब्द वापरून नाभिक समाजाचा अपमान केला आहे. त्यांच्या असंसदीय कृतीने नाभिक समाज आक्रमक झाला असून महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत उर्फ डुडू नक्षिणे यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधानाना निवेदन पाठवून तात्काळ राजीनामा घ्यावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे.

राजकीय भाषणे देतांना बहुजन समाजाला उद्देशुन अपशब्द वापरणारे नेते कोणतेही तारतम्य न बाळगता बरळतात. बहुजन समाजातील जाती यांच्या दावणीला बांधलेल्या नाहीत हे ‘त्या’ नेत्यांनी लक्षात ठेवावं असं निवेदनातून खडसवण्यात आलं आहे.

तीन वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व आता केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यानी बहुजन समुहातील नाभिक समाज बांधवांचा निंदनीय शब्दात अपमान केला आहे. यामुळे संपूर्ण राज्यातील नाभिक समाजाच्या भावना तीव्र झाल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा अथवा त्यांनी समाजाची केलेल्या बदनामी बद्दल जाहिर माफी मागावी अन्यथा संपूर्ण राज्यातील नाभिक समाजासह बहुजन समाज आंदोलन करण्याच्या तयारित आहे. जर या पासून राज्यात कुठलीही विपरीत परिस्थिति निर्माण झाली तर त्यास सर्वस्वी शासन जबाबदार राहील असे निवेदनातून स्पष्ट केले आहे.

यावेळी महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे शामराव घुमे, निखिल मांडवकर, पदमाकर हनमंते, प्रभाकर कडुकर, नरेश येसेकर, भालचंद्र मांडवकर, सतिष हनमंते, जितेंद्र घुमे, युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे, सागर वाटेकर, प्रज्वल नागतूरे, गणेश मांडवकर, चंद्रकांत नक्षिणे, सुरज नक्षिणे, बबन वाटेकर, निकेश कडुकर, अँड प्रतिशा दहीवलकर यांची उपस्थिती होती.
वणी: बातमीदार