Home Breaking News चक्क…नैसर्गिक नाल्याच्या प्रवाहच बदलला

चक्क…नैसर्गिक नाल्याच्या प्रवाहच बदलला

384

भविष्यात दुर्घटना घडण्याचे संकेत
लेआऊट धारकाची मनमानी

वणी: नांदेपेरा मार्गावरील एका शेतातुन वाहणारा गुंजेचा नाला लेआऊट टाकताना अडसर ठरत असल्याने त्याचा प्रवाहच बदलण्यात आल्याची बाब उघडकीस आली आहे. लेआऊट धारकाची मनमानी महसूल विभाग खपवून कशी घेते असा उपरोधिक सवाल सपा चे प्रदेश कोषाध्यक्ष रज्जाक पठाण यांनी उपस्थित केला आहे.

वणी-नांदेपेरा रस्त्यालगत गुंजेचा नाल्याजवळ असलेले मौजा चिखलगांव शेत सर्व्हे क्र. 29/3, 28/4, 29/3 अ नगरवाला जिनींग स्पिनींग मिल्स प्रा. लिमीटेड या नावाने आहेत. तर सर्व्हे क्र. 28/4 खुशी तुषार नगरवाला या नावाने शेत असून वरील 4 ही शेताचे जगन्नाथ नगर या फर्म सोबत शेती विकण्याचा सौदा झाला असून शेताचे इसारपत्र करण्यात आले आहेत.

उपरोक्त शेतातून गुंजेचा जिवंत नाला प्रवाहित आहेत. हा नाला कळमना रस्त्याजवळून वरील शेतातून वाहतो. याच नाल्यावर नांदेपेरा रस्त्यावर पुल सुध्दा बांधून आहेत. असे असतांना लेआऊट धारक ‘जगन्नाथ नगर’ यांनी वरील शेतात लेआऊट टाकण्याकरीता संपूर्ण शेती लेव्हल केलेली आहे. यावेळी त्या लेआऊट धारकाने नाल्याच्या नैसर्गिक प्रवाहाची दिशाच बद्दलविण्यात आल्याने होणारी मनमानी उजागर झाली आहे.

लेआऊट धारक ‘जगन्नाथ नगर’ किंवा नगरवाला यांना नाला बंद करण्याची परवानगी कोणी दिली किंवा स्वतःच्या मर्जीतून नाला बंद करता येतो का? असा प्रश्न तक्रारकर्ता रज्जाक पठाण यांनी उपस्थित केला आहे. त्यातच उपजाऊ कृषक असणारी शेत जमीन अकृषक करताना लेआऊट धारकांनी अटी व शर्थीचे पालन केले काय हे तपासावे तसेच शेतातील नैसर्गिक नाला “गायब” करणाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
वणी: बातमीदार