Home Breaking News कशीश कोचर अव्वल, बारावीच्या परीक्षेत मुलींचा बोलबाला

कशीश कोचर अव्वल, बारावीच्या परीक्षेत मुलींचा बोलबाला

2795

तालुक्याचा निकाल 86 टक्के

वणी– महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आज बारावीचा ऑनलाईन निकाल जाहीर केला आहे. यावर्षी मुलींनी बाजी मारल्याचे दिसत असून वणी पब्लिक स्कूलची वाणिज्य शाखेची कशीश रुपेश कोचर हिने 89.33 टक्के गुण प्राप्त करून तालुक्यातुन प्रथम आली आहे. तर शिक्षण प्रसारक मंडळ जुनियर कॉलेज विज्ञान शाखेची अलविरा कुरेशी ही 88.67 टक्के गुण घेऊन तालुक्यातून दुसरी आली आहे.

कला व विज्ञान शाखेतून प्रथम येण्याचा मान मुलींनीच मिळविला आहे तर वणी तालुक्याचा निकाल 86.66टक्के लागला आहे.

शाळा निहाय निकाल पुढील प्रमाणे
लोकमान्य टिळक महाविद्यालय 75.99 टक्के
शिक्षण प्रसारक मंडळ कनिष्ठ महाविद्यालय 95.16 टक्के, आदर्श जुनियर कॉलेज घोंसा 82.35 टक्के, पंचशील जुनियर कॉलेज नांदेपेरा 94.62 टक्के, गुरुदेव जुनियर कॉलेज शिरपूर 90.68 टक्के, जी प उर्दू जुनियर कॉलेज वणी 100 टक्के, आदर्श जुनियर कॉलेज वणी 100 टक्के, राष्ट्रीय जुनियर कॉलेज राजूर 93.02 टक्के, आदर्श जुनियर कॉलेज शिंदोला 100 टक्के, जगन्नाथ बाबा जुनियर कॉलेज वांजरी 100 टक्के, वणी पब्लिक स्कूल 100 टक्के, जगन्नाथ महाराज जुनियर कॉलेज वणी 76.92 टक्के, बालाजी उच्च माध्यमिक विद्यालय सावरला 100 टक्के, वणी लायन्स इंग्रजी मिडीयम स्कूल 97.61टक्के, राजे संभाजी जुनियर कॉलेज कायर 96.72 टक्के, महात्मा ज्योतिबा फुले जुनियर कॉलेज कायर 91.5 टक्के, भास्करराव ताजने जुनियर कॉलेज वेळाबाई 92.85 टक्के, भास्करराव ताजने उच्च माध्यमिक विद्यालय कळमना 96 टक्के, लो टी महाविद्यालयात एम सी वी सी 72.41टक्के असा महाविद्यालय निहाय टक्केवारी आहे.

तालुक्यातील 19 शाळां पैकी सहा शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे. वणी तालुक्यातून यावर्षी 2167 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती त्यापैकी 1878 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने परीक्षा विद्यार्थी शिक्षण घेत असलेल्या शाळेतच घेण्यात आली होती. त्यामुळे बहुतांश शाळांच्या निकालात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
वणी: बातमीदार