Home Breaking News दहावीत 90 तर बारावीत 65 टक्के गुण, नैराश्यग्रस्त विद्यार्थिनींची ‘आत्महत्या’

दहावीत 90 तर बारावीत 65 टक्के गुण, नैराश्यग्रस्त विद्यार्थिनींची ‘आत्महत्या’

1885

लालगुडा येथील दुर्दैवी घटना

वणी – बारावीत समाधानकारक गुण न मिळाल्याने नैराश्याने ग्रासलेल्या बालिकेने आत्मघाती पाऊल उचलले. तिला दहावीत 90 तर बारावीत 65 टक्के गुण मिळाले होते. शहरालगतच असलेल्या लालगुडा येथील 17 वर्षीय विद्याथीनीने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना गुरुवार दि. 9 जूनला घडली.

सेजल अनिल सालुरकर(17) असे आत्महत्या केलेल्या विद्याथीनीचे नाव आहे. ती लालगुडा येथे वास्तव्यास होती. सेजल शहरातील नामांकित महाविद्यालयात शिक्षण घेत होती. नुकत्याच जाहीर झालेल्या 12 वी च्या परीक्षेत लागलेल्या निकालात तिला 65 टक्के गुण मिळाले होते.

सेजल चे वडील मिस्त्री काम करतात दि. 9 जुलै ला सकाळी तिची आई व वडील दोघेही कामानिमित्त बाहेर गेले होते. सेजल एकटीच घरी होती, तिने ओढणी च्या सहाय्याने पंख्याला गळफास लावला सकाळी 11 वाजताचे सुमारास ही घटना उघडकीस आली.

विशेष म्हणजे सेजल अतिशय हुशार होती तिला दहावीला 90 टक्के मिळाले होते तर बारावीला 65 टक्के मिळाले कमी गुण मिळाल्याने तिने नैराश्यातुन हे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.
वणी: बातमीदार