Home Breaking News युवा शेतकऱ्याने शेतातच गळफास घेतला

युवा शेतकऱ्याने शेतातच गळफास घेतला

2451

भालर गावात पसरली शोककळा

वणी: तालुक्यातील भालर या गावातील 23 वर्षीय युवा शेतकऱ्यांने झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना सोमवार दि. 20 जूनला सकाळी उघडकीस आली.

हेमंत राजू खंगार (23) असे दुर्दैवी मृतकाचे नाव आहे. तो भालर गावात वास्तव्यास होता. त्याने हे टोकाचे पाऊल का उचलले हे कळायला मार्ग नाही. रॉकवेल कँपनीच्या मागे असलेलय शेतात सोमवारी पहाटे प्रत्यक्षदर्शींला त्याचा झाडा ला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला.

घटनेची वार्ता गावात पसरली यामुळे नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच पोलिसांना सूचित करण्यात आले. मृतक हेमंत हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या अकस्मात मृत्यूने परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात शोककळा पसरली आहे. त्याने गळफास का घेतला याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
वणी: बातमीदार

http://http;rokhthok.com/2022/06/2o/16525