Home Breaking News ओला दुष्काळ जाहीर करून नुकसान भरपाई द्या..!

ओला दुष्काळ जाहीर करून नुकसान भरपाई द्या..!

236

  क्रांती युवा संघटनेची मागणी

वणी: मागील पंधरा दिवसापासून पावसाने उसंत घेतली नाही. तालुक्यातील तब्बल 50 टक्के शेतकरी दुबार पेरणीच्या उंबरठ्यावर आहेत. सततच्या पावसामुळे पिके नष्ट झाली असून शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी क्रांती युवा संघटनेने उप विभागीय अधिकारी यांचे मार्फत मुख्यमंत्री यांना पाठवलेल्या निवेदनातुन केली आहे.

खरिप हंगामामध्ये पावसाचे उशिरा आगमन झाल्यामुळे शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट ओढवले होते. काही शेतकऱ्याना तर पदरमोड करून दुबार पेरणी करावी लागली. मागील आठवड्यात सामाधानकारक पाऊस पडल्यामुळे पिके चागल्या स्थितीत होती. परंतु गेल्या काही दिवसापासून सततधार पाऊस पडल्यामुळे पिके पिवळी होऊन नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.

सततच्या पावसामुळे पिके नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकटामुळे मोठे आर्थिक नुकसान होऊन आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. अतिवृष्टीमुळे ग्रस्त शेतकऱ्यांना प्रशासनाने नुकसानीचा अहवाल तातडीने राज्य सरकारकडे पाठवून परिसरातील शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत देऊन दिलासा द्यावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

या प्रसंगी राकेश खुराणा, ऍड.सुरज महारतळे, अविनाश भुजबळराव, अभिजित पथाडे, उमेश असुटकार, आकाश महाडूळे, रोहित काळे, दिनेश मांडवकर, अमोल मोहूर्ले, सुरज चाटे, राजू गव्हाणे, सतीश गेडाम, प्रमोद लोणारे, सुधीर खंडाळकर, महादेव दोडके यांची उपस्थिती होती.
वणी: बातमीदार