● व्हायरल ऑडिओ क्लिपचा परिणाम
रोखठोक | पाटण पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत सपोनि महिला ठाणेदारांने मटका चालकाला पैशाची मागणी करणारी कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. जिल्हा पोलिस अधीक्षकांनी खातरजमा केल्यानंतर त्या….महिला ठाणेदारांची उचलबांगडी करून संदीप पाटील यांच्याकडे प्रभार सोपवला आहे.
पोलीस खात्यात थोडसं डॅशिंग कर्तव्य बजावलं की बक्षिसी दिली जाते. वणी ठाण्यात कर्तव्य बजावत असताना केलेल्या कार्याची दखल घेत त्या सपोनि यांना पाटण पोलीस ठाण्याच्या प्रभार सोपविण्यात आला होता.
तेलंगणा राज्याच्याच्या सीमेवर असलेल्या पाटण पोलीस ठाण्याला उप विभागात मलाईदार ठाणे असल्याची ओळख प्राप्त झाली आहे. मटका, जुगार, गोवंश तस्करी सारखे अवैद्यधंदे जोमात चालत असलेला हा परिसर आहे. अवैध व्यवसायावर आळा घालण्यासाठी स्थानिक ठाणेदारांना कठोर असावं लागतं.
पाटण पोलीस ठाण्याच्या महिला ठाणेदाराने मटका चालवणाऱ्या व्यक्तीला पैशाची मागणी केली. व आजच रक्कम पोहचवावी असे आदेश दिले. मटका व्यावसायिकाने धंदा बंद असल्याचे सांगितले तरी ऐकण्याच्या मानसिकतेत नसलेल्या ठाणेदारांनी केलेला आग्रह त्या कथित ऑडिओ क्लिप मधून उजागर होतो.
अवैद्य व्यवसायिकांबरोबर हितसंबंध प्रस्थापित करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई होणे अपेक्षित आहे. अवैद्य व्यावसायिकांकडून मासिक मलिदा लाटण्याची सवय लागलेल्या अधिकाऱ्याकडून काय अपेक्षा करावी. अशा प्रकारामुळे पोलिसांची प्रतिमा मालिन होते. नव्यानेच रुजू झालेले जिल्हा पोलीस अधीक्षक पवन बन्सोड यांनी तडकाफडकी कारवाई केल्याने अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
वणी : बातमीदार