● शिवसेना उध्दव ठाकरे गट आक्रमक
रोखठोक | देशात महागाईने नवा उच्चांक गाठला आहे. सर्वसामान्य नागरीक महागाईच्या चटक्याने होरपळत असतांना राज्य व केंद्र शासन ठोस उपाययोजना अमलात आणत नसल्याने शिवसेना उध्दव ठाकरे गट आक्रमक होतांना दिसत आहे. उपजिल्हा प्रमुख संजय निखाडे यांचे नेतृत्वात येथील शिवतिर्थावर राज्य व केंद्र सरकार विरोधात निषेध आंदोलन करत उप विभागीय अधिकारी (SDO) यांचे मार्फत पंतप्रधानांना निवेदन पाठवण्यात आले.
उध्दव ठाकरे ( Uddhav Thackeray ) गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख तसेच माजी आमदार विश्वास नांदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवार दि. 9 मार्चला निषेध आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी छञपती शिवाजी महाराज यांचे अश्वारुढ पुतळया समोर मोठया संख्येने शिवसैनिक जमा झाले होते. केंद्र व राज्य शासनाचा यावेळी निषेध करण्यात आला. आंदोलनकर्त्यांनी उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत पंतप्रधान यांना निवेदन सादर केले आहे.
संपुर्ण देशात महागाईने उच्चांक गाठला आहे. सर्वसामान्य जनता अतिशय ञस्त झाली आहे. जीवनावश्यक वस्तुचे दर गगनाला भिडत आहे. “न भुतो न भविष्यती” अशी महागाई जनतेला अनुभवावी लागत आहे. यामुळे नोकरदार, शेतकरी, शेतमजुर, कामगार देशोधडीला लागतांना दिसत असल्याचे स्पष्ट करत जीवन मरणाचा प्रश्न नागरीकांसमोर उभा ठाकलेला आहे. तरी सुद्धा केंद्र शासन कोणतीही उपाययोजना करतांना दिसत नसल्याने भविष्यात मोठा उद्रेक निर्माण होण्याची शक्यता निवेदनातुन वर्तविण्यात आली आहे.
महागाई सातत्याने वाढत असतांना शेत पिकांचे भाव पाडण्यात आले आहे. कापुस, सोयाबीन, हरभरा या शेत पिकांचे भाव सरकारच्या धोरणामुळे गडगडल्याचा आरोप निवेदनातुन करण्यात आला आहे. देशातील कांदा उत्पादक शेतकरी देशोधडीला लागल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. केंद्र व राज्य सरकारने तातडीने महागाई कमी करावी व शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य दरवाढ दयावी अशी मागणी करण्यात आली असुन राज्य व केंद्र शासनाचा तिव्र निषेध करण्यात आला आहे.
यावेळी सुनील कातकडे, शरद ठाकरे, गणपत लेडांगे, रवी बोढेकर, सुधीर थेरे, महेश चौधरी, प्रशांत बलकी, अजय चन्ने, संभा मत्ते, मंगेश मत्ते, योगीता मोहोड, बबीता आवारी, सुनंदा घुगे, पुष्पा भोगेकर, संजय पुरावार, अजिंक्य शेंडे, धर्मा काकडे, स्वप्नील ताजणे, प्रसाद ठाकरे, कुणाल लोणारे, सचिन पाटील, राजु गोलाईत, सोनु पावडे यांचे सह शिवसैनिक उपस्थित होते.
वणी : बातमीदार