● युवकांचा कल मनसेकडे
रोखठोक | वणी उप विभागातील ग्रामीण भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद वाढत आहे. महिला आणि तरुण मनसेत सातत्याने प्रवेश करताना दिसत आहे. तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या नेतृत्वात टाकळी (चिखली) येथे अनेक युवकांनी पक्षात रीतसर प्रवेश केला आहे.
अगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेत वणी विधानसभा क्षेत्रात मनसेचे स्थानिक पदाधिकारी पक्ष बांधणी करताहेत. नुकतेच पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांचे आदेशाने राजू उंबरकर यांना पक्षाचे नेतेपद बहाल करण्यात आल्याने महाराष्ट्र सैनिकात चांगलाच उत्साह संचारला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झंझावात विधानसभा क्षेत्रात सुरू आहे. प्रमुख पदाधिकारी झपाटल्यागत पक्ष विस्तार करताहेत. तरुण, महिला व गावागावातील अन्य पक्षीय कार्यकर्ते मनसेत प्रवेश करत आहेत. टाकळी (चिखली) येथील धडाडीच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची धुरा सांभाळली आहे.
मनसेचे नेते राजू उंबरकर यांच्या मार्गदर्शनाखाली उप विभागातील पदाधिकाऱ्यांनी संघटना बांधणीकडे लक्ष दिले आहे. टाकळी (चिखली) येथील पक्ष प्रवेशाप्रसंगी तालुका उपाध्यक्ष धीरज पिदुरकर, मारोती बोटपेले, कार्तिक राजगडकर, चेतन म्हसे, अमित वऱ्हाटे यांच्यासह अनेक मन सैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.
वणी : बातमीदार