Home क्राईम शेतीपयोगी साहीत्‍य लंपास करणारे चोरटे जेरबंद

शेतीपयोगी साहीत्‍य लंपास करणारे चोरटे जेरबंद

● चौघे ताब्यात, वणी पोलिसांची कारवाई

1476

चौघे ताब्यात, वणी पोलिसांची कारवाई

Crime News , Wani |वणी पोलीस स्‍टेशन हददीतील मोहर्ली शिवारातुन 2 ते 4 मे च्‍या दरम्‍यान अज्ञात चोरटयांनी शेतीपयोगी सिंचन साहीत्‍य लंपास केले होते. याप्रकरणी पोलीसांनी अतिशय बारकाईने तपास करून चार चोरटयांना ताब्‍यात घेतले आहे. Agricultural irrigation materials were dumped. In this case, the police have conducted a thorough investigation and arrested four thieves.

शेतीची मशागत पुर्ण करून शेतकरी मान्सूनपूर्व पेरणी करण्‍याच्‍या लगबगीत असतांनाच स्पिंकलर नोजल व झटका मशिन लंपास करण्‍यात आल्‍याची घटना मोहर्ली येथे घडली होती. याप्रकरणी वणी पोलीसात शेतकऱ्यांनी शेतातील एक झटका मशिन व 140 नग स्प्रिंकलर नोझल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्‍याची तक्रार दाखल केली होती.

श्रीकांत पांडुरंग काळे (19) रा. राजुर कॉलरी, प्रज्‍योत देवानंद पाटील (22) रा. रातुर कॉलरी, सचिन राजु वाईकर (23) रा. गोकुलनगर व मुकेश संजय जोशी (25) रा. गोकुलनगर असे पोलीसांनी जेरबंद केलेल्‍या चोरट्यांची नावे आहे. त्‍यांनी गुन्‍हयाची कबुली दिली असुन मुद्देमाल दिपक चौपाटी परीसरातील भंगार व्‍यवसायीक जाकीर हुसेन मुजफर हुसेन (52) यांना विकल्‍याचे सांगीतले. याप्रकरणी चोरीच्‍या मुददेमालापैकी 102 स्‍पींकलर नोझल  हस्‍तगत करण्‍यात आले आहे.

सदर कारवाई पोलीस अधिक्षक डॉ. पवन बनसोड,  अप्‍पर पोलीस अधिक्षक पियुष जगमाप, SDPO गणेश किंद्रे यांच्‍या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक अजित जाधव, पोलीस उपनिरीक्षक आशिष झिमटे, शुभम सोनुल, शंकर चौधरी, सागर सिडाम यांनी केली असुन पुढिल तपास पंकज उंबरकर करत आहे.
Rokhthok News