● जखमी पोलिसांवर उपचार सुरू
Accident News | महामार्ग पोलिसांच्या वाहनाला आयशर वाहनाने जबर धडक दिली. या भीषण अपघातात पोलिसांच्या वाहनाचा चुराडा झाला असून एका पोलीस कर्मचाऱ्यांसह रस्त्यावर उभा असलेल्या दुसऱ्या वाहनाचा चालक असे दोघे मृत्युमुखी पडले. तर दोन पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना शनिवार दि 29 जुलैला रात्री उशिरा घडली. A highway police vehicle was hit hard by an Eicher vehicle. The police vehicle was crushed in this accident.
संजय रंगराव नेटके (41)असे मृतक पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव असून म. पो. केंद्र उमरखेड येथे कर्तव्यावर होते तर लक्ष्मी नगर पुसद येथील निवासी होते. या भीषण अपघात रस्त्यावर उभे असलेल्या वाहनांच्या चालकाचा सुध्दा मृत्यू झाला असून पांडुरंग हरी नखाते (50) रा. मगरवाडी ता. पंढरपूर जि. सोलापूर असे त्यांचे नाव आहे.
राष्ट्रीय महामार्ग 361 वरील कोसदणी गावाजवळील पुलावर आयशर क्रमांक MH-13-CU-4982 हे वाहन बंद पडले होते. महामार्ग पोलीस वाहन क्रमांक MH-12- RT- 9611 मधून रात पेट्रोलिंग करत असताना बंद वाहनांच्या मागे आपले वाहन उभी केले. बंद असलेल्या आयशर ला बाजूला लावण्या करिता सांगत असतानाच मागून भरधाव येत असलेल्या दुसऱ्या आयशर ट्रक क्रमांक UP- 63 -BT -9127 ने जबर धडक दिली. या भीषण अपघात दोघे ठार तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
या भीषण अपघातात कुणाल बबनराव साळवे (41) पोलीस वाहन चालक रा. वैभव नगर यवतमाळ व संतोष देवराव हराळ (39) रा. वसंतनगर पुसद असे दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. त्यांना पुढील उपचारार्थ हलविण्यात आले आहे. या घटनेचा तपास आर्णी पोलीस करताहेत.
Rokhthok News