● लाठी व पिंपरी शिवारात धाडसत्र
Wani News | उप विभागात कोंबड बाजाराला उधाण आले आहे. मुकुटबण हद्दीतील घोंसा शिवारात बिनधास्त चालणारा कोंबड बाजार पोलिसांना दिसत नाही तर शिरपूर पोलिसांनी मात्र लाठी व पिंपरी शिवारात धाडसत्र अवलंबत होऊ घातलेला कोंबड बाजार उधळला असून पाच जुगाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. Lathi and Pimpri Shiwar, the kombad bazar, which was about to be launched, collapsed
दिपक वारलू तेलंग (25) रा. बेसा, सुरेद्र किसन पिंपळकर (38) रा. चिखली या जुगाऱ्यांना लाठी शेत शिवारातून ताब्यात घेतले तर शालीक नामदेव तुरणकार (38), संतोष तुकाराम टेकाम (35) व जावेद कालु शेख (51) तिघेही राहणार नेरड (पु) यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
उपविभागात कोंबड बाजाराला खुलेआम सूट दिली की काय असे वाटायला लागले आहे. मुकूटबण पोलिसांच्या हद्दीत येत असलेल्या घोंसा परिसरातील झरी मार्गावरील दहेगाव शिवारातील जंगलव्याप्त भागात शुक्रवारी व आज रविवारी कोंबड बाजाराची जत्रा स्थानिकांना अनुभवायला मिळाली आहे.
शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत लाठी व पिंपरी शिवारात कोंबड बाजार चालवायचा बेत जुगाऱ्यानी आखला होता. याची गोपनीय माहिती ठाणेदार संजय राठोड यांना मिळाली. लगेचच दोन पथक तयार करून दोन्ही ठिकाणी धाड सत्र अवलंबले.
या कारवाईत दोन्ही ठिकाणावरून पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आले तर कोंबड बाजारासाठी लागणारे साहित्य व झुंजी करिता वापरण्यात येणारे मृत कोंबडे जप्त करण्यात आले. या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करताहेत.
Rokhthok News