Home Breaking News पैनगंगा फुगली, शेतात शिरले पाणी

पैनगंगा फुगली, शेतात शिरले पाणी

● आ. बोदकुरवार यांनी केली पाहणी

2663
C1 20240404 14205351

आ. बोदकुरवार यांनी केली पाहणी

Wani News | वणी विधानसभा क्षेत्रातील झरी जामणी तालुक्यात धानोरा, दुर्भा, दिग्रस या गावात पैनगंगा नदीचे पाणी शेतात शिरले. आ. संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी थेट बाधित परिसर गाठून पाहणी केली व अधिकाऱ्यांना सूचना केल्यात. Mla Sanjeevreddy Bodkurwar directly reached the affected area and inspected it and informed the authorities.

c1_20230722_20230536

यवतमाळ जिल्ह्यात पावसाने चांगलाच हाहाकार माजवला आहे. हवामान विभागाने जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार यवतमाळ जिल्ह्यात रेड अलर्ट जाहीर केला आहे. जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस, अतिवृष्टी होत आहे.

पैनगंगा नदी चांगलीच फुगली असून वणी विधानसभा क्षेत्रातील झरी जामनी तालुक्यात धानोरा, दुर्भा, दिग्रस येथील शेतात पाणी शिरले. खुप मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे. आ. बोदकुरवार यांनी बाधित शेतांची तसेच नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली व गावकऱ्यांशी चर्चा केली व अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत.
Rokhthok News