Home Breaking News दुर्दैवी…..पंधरा ते वीस मोकाट जनावर दगावले

दुर्दैवी…..पंधरा ते वीस मोकाट जनावर दगावले

1215

राजूर कॉलरी परिसरातील घटना

रोखठोक | मन हेलवणारी घटना राजूर कॉलरी परिसरात उघडकीस आली. तब्बल पंधरा ते वीस मोकाट जनावर दगावल्याची बाब रविवार दि 25 डिसेंबर ला दुपारी उजागर झाली. या घटनेमुळे संताप व्यक्त होत आहे.

राजूर कॉलरी परिसरसतील गुप्ता कोलवॉशरी परिसरात मोकाट गोवंश दगावत असल्याचे स्थानिकांच्या निदर्शनास आले. एक-एक करत पंधरा ते वीस मोकाट जनावरांनी तडफडत जीव सोडला. हा काय प्रकार आहे हे काळायला मार्ग नव्हता. जनावरांच्या तोंडातून फेस येत असल्याचे प्रत्यक्षदर्शींना दिसले.

परिसरातील शेतकऱ्यांच्या शेत पिकावर ताव मारणाऱ्या वन्य जीव व मोकाट जनावरामुळे प्रचंड नुकसान होत होते. यामुळेच त्या पीडित शेतकऱ्याने शेतात थीमेट हा विषारी पदार्थ ठेवला असावा असा कयास वर्तवण्यात येत आहे. त्या शेतकऱ्याने वन्य प्राण्यांच्या उपद्रवामुळे हे कृत्य केले असावे असे सुद्धा बोलल्या जात आहे.

राजूर कॉलरी परिसरात घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे चांगलीच हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी सखोल चौकशी व्हावी असे मत स्थानिक व्यक्त करताहेत. शेतात ठेवलेले ते विष वन्य प्राण्यांसाठी होते का हे सुध्दा तपासण्या ची गरज निर्माण झाली आहे.
वणी : बातमीदार

Previous articleअंतरजिल्हा चोरट्यांचा पाठलाग, तिघे ताब्यात
Next articleमारोतराव भारती यांचे निधन
Whatsapp Image 2021 07 18 At 1.43.51 Pm (1)
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.