ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांची प्रमुख उपस्थिती

वणी बातमीदार: वणी येथील अग्रगण्य श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेच्या ग्रामीण शाखेचे शहरातील राम शेवाळकर परिसरात रविवार दि 1 ऑगस्ट ला दुपारी थाटात उद्घाटन होणार आहे. ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार असून स्वागताध्यक्ष पथसंस्थेचे अध्यक्ष ऍड देविदास काळे हे असतील.
आयोजित समारंभात खासदार बाळू धानोरकर, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार हे प्रमुख अतिथी असणार आहेत तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी आमदार वामनराव कासावार असतील. प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, माजी आमदार विश्वास नांदेकर, टीकाराम कोंगरे, राजूदास जाधव, संजय देरकर, वसंत घुईखेडकर यांची उपस्थिती असेल.
श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेच्या वणी, मारेगाव, मुकुटबन, घाटंजी, यवतमाळ, आर्णी, वरोरा, गडचांदूर, चंद्रपूर, ब्रह्मपुरी, राजूरा, भद्रावती, चिमूर, मुल इथे शाखा आहेत. त्यातच आता राम शेवाळकर परिसरात नवीनतम ग्रामीण शाखा होत असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना फायदा होणार आहे.