रोटरी क्लब चे आयोजन
वणी बातमीदार:– राज्यात रक्ताचा तुडवडा जाणवत असल्याने नागरिकांनी रक्तदाना करिता पुढे यावे. या करिता स्वातंत्र्य दिनी रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी ने शहरात सायकल रॅली काढून रक्तदान शिबीर घेतले.

रक्त दान श्रेष्ठ दान मानल्या जाते.या रक्तदाना मुळे अनेकांचे प्राण वाचविण्यात मदत होते. मात्र गेल्या दीड वर्षांपासून कोरोना मुळे रक्तदान शिबिरे बंद पडली आहे. त्यामुळे राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे.या करिता राज्य शासनाच्या वतीने रक्तदान करण्याचे आव्हान करण्यात येत आहे.
येथील रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटीच्या वतीने जनजागृतीसाठी टिळक चौकातून सायकल रॅली काढण्यात आली.या रॅलीला ठाणेदार वैभव जाधव यांनी हिरवी झेंडी दाखवून रॅलीची सुरवात केली. या रॅलीला ताटेवार सायकल स्टोर्स यांचे विशेष सहकार्य लाभले.
सम्पूर्ण शहरात सायकल रॅली फिरून येथील बाजोरिया हॉल मध्ये समाप्त करण्यात आली त्या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष, माजी नगराध्यक्ष राकेश खुराणा यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
या शिबिराला युवकांचा मोठा प्रतिसाद मिळाला 101 रक्तदात्यांनी रक्तदान केले.यावेळी अध्यक्ष विनोद खुराणा,माजी अध्यक्ष निखिल केडीया, अध्यक्ष नियुक्त निकेत गुप्ता, अनिल उत्तरवार,उपाध्यक्ष आशिष गुप्ता,सचिव डॉ परेश पटेल,सहसचिव लवलेश लाल,खजिनदार अश्विन कोंडावार,सार्जंट आर्म मयूर अग्रवाल,सदस्य प्रकाश कावडे,लक्ष्मण उरकुडे,मयूर गेडाम,आचल जोबनपुत्रा,हिमांशू बत्रा, अस्लम चिनी,दानु अग्रवाल, राजेश राठी,विनोद बाजोरिया, गौरव गोयल, रुद्रा ताटेवार उपस्थित होते.