Home Breaking News डॉक्टरचे घर फोडले, साडेचार लाखाची चोरी

डॉक्टरचे घर फोडले, साडेचार लाखाची चोरी

● अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

C1 20250425 07230534

अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

Crime News | बोढाले ले-आऊट, चिखलगाव येथे वास्तव्यास असलेल्या डॉक्टरचे कुलूपबंद घर चोरट्यांनी फोडले. ही घटना 19 ते 24 एप्रिल या कालावधीत घडली असून तब्बल साडेचार लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबवल्याची तक्रार डॉ. हेमंत पुरुषोत्तम देठे (37) यांनी वणी पोलीस स्टेशनमध्ये नोंदवली आहे. Thieves broke into the doctor’s locked house.

डॉ. देठे हे आपल्या कुटुंबासह नागपूर येथे लग्नासाठी गेले असताना, त्यांच्या अनुपस्थितीत अज्ञात चोरट्यांनी घराचे मुख्य दरवाज्याचा कडी-कोंडा कापून घरात प्रवेश केला. घरातील बेडरूममधील लोखंडी कपाटाचे लॉक तोडून चोरट्यांनी सोनं-चांदीचे दागिने आणि रोकड असा मुद्देमाल लंपास केला आहे.

या घटनेत सोन्याचे दोन मंगळसूत्र (20 ग्रॅम) एक लाख साठ हजार रुपये, सोन्याच्या दोन अंगठ्या (10 ग्रॅम) 80 हजार रुपये, लहान मुलीच्या दोन अंगठ्या (4 ग्रॅम) 32 हजार रुपये, एक सोन्याचा गोप 32 हजार रुपये, चांदीचे सहा चाळ 10 हजार रुपये व रोकड एक लाख 35 हजार असा एकूण 4 लाख 49 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.

Img 20250103 Wa0009

घरात चोरी झाल्याची घटना 24 एप्रिल ला उघडकीस आली. यानंतर डॉ. देठे यांनी तत्काळ वणी पोलीस ठाण्यात संपर्क साधला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणी कलम 331(4), 305(A) BNS अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

वणी परिसरात घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी होत आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सुदाम आसोरे पुढील तपास करत आहेत.
Rokhthok News