Home वणी परिसर राम मुडे यांना आचार्य पदवी

राम मुडे यांना आचार्य पदवी

143

वणी बातमीदार: वणीतील इतिहास अभ्यासक प्रा.राम मुडे यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने नुकतीच आचार्य पदवी प्रदान केली आहे.

प्रा. राम मुडे यांनी आचार्य दादा धर्माधिकारी यांच्या जीवन आणि कार्याचे ऐतिहासिक अध्ययन 1899-1985 या विषयावरील शोधप्रबंध  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाकडे  आचार्य पदवीकरिता सादर केला होता. संधोधन कार्यात प्रा.डॉ. गोविंद तिरमनवार इतिहास विभाग स्व. दत्तात्रय पुसदकर कला महाविद्यालय अमरावती यांचे मार्गदर्शन लाभले.

नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर इतिहास विभागाचे विभाग प्रमुख प्रा.डॉ. संगिता मेश्राम, प्रा.डॉ. शुभा जोहरी, प्रा. डॉ. शाम कोरेटी, न्यायमूर्ती स्व.चंद्रशेखर धर्माधिकारी, इतिहासचार्य स्व. डॉ. भा.रा.अंधारे, समाजसेविका लिला चितळे यांना प्रा.राम मुडे यांनी त्यांच्या संशोधनाचे श्रेय दिले आहे.