Home सामाजिक सामाजिक उपक्रमांनी साजरा होणार निखिल देठे यांचा वाढदिवस

सामाजिक उपक्रमांनी साजरा होणार निखिल देठे यांचा वाढदिवस

79

* घाटंजी शहरात कार्यक्रमाची रेलचेल

         घाटंजी: छत्रपती महोत्सव समिती व निखिल देठे मित्र परिवार यांच्या वतीने गुरुवार दि 2 सप्टेंबर ला सकाळी 9 वाजतापासून दिवसभर विविध सामाजिक व जनहितार्थ उपक्रम राबविण्यात येणार आहेत. औचित्य निखिल राजेंद्र देठे यांच्या वाढदिवसाचे असून घाटंजी शहरात वृक्षारोपण, फळ वाटप, स्यानिटरी पॅडचे वाटप करण्यात येणार आहे.

Img 20250422 wa0027

छत्रपती महोत्सव समितीच्या कार्यकर्त्यांनी निखिल देठे यांचा वाढदिवस सामाजिक बांधिलकी व जनहितार्थ उपक्रम राबवत साजरा करण्याचा निर्णय घेतला. सोबतच कोविड त्रिसूत्रीचे पालन करत सकाळी 9 वाजतापासून मूलभूत गरजाची पूर्तता करण्यात येणार आहे. सर्वप्रथम घाटंजी शहरात डेंग्यूचा वाढता प्रभाव बघता शहरात सर्वत्र फोगिंग मशिनद्वारे फवारणी करण्यात येणार आहे तसेच संघरात ठिक ठिकाणी वाढलेल्या गवतावर तण नाशक फवारणी करण्यात येईल.

Img 20250103 Wa0009

दुपारी 1 वाजता घाटंजी ग्रामीण रुग्णालयात स्यानिटरी पॅडचे वाटप करण्यात येणार असून रुग्णांना फळ वाटप करण्यात येणार आहे. तसेच दुपारी 4 वाजता शहरात वृक्षारोपण करण्यात येणार असून त्याचे संवर्धन निखिल देठे मित्र परिवार करणार आहे. सामाजीक उपक्रम राबवत वाढ दिवस साजरा करण्याचा निर्णय छत्रपती महोत्सव समिती व निखिल देठे मित्र परिवार यांनी घेतला आहे.