Home Breaking News वाघाने पाडला गाईचा फडश्या

वाघाने पाडला गाईचा फडश्या

462

◆सुकनेगाव शिवारातील घटना 

वणी  :-तालुक्यात वाघाचा हल्ला करण्याचा घटनेत वाढ होत असल्याचे दिसत असून सुकनेगाव शिवारात वाघाने गाईवर हल्ला चढवून ठार केल्याची घटना घडली आहे.

Img 20250422 wa0027

तालुक्यात वाघाचा वावर वाढला आहे. वाघाने हल्ला चढविल्याच्या अनेक घटना उघडकीस येत आहे. आठ दिवसा पूर्वीच सुकनेगाव शिवारात वाघाने बैलावर हल्ला करून जखमी केले होते. तर साखरा येथील शाळेच्या आवारात वाघाच्या पावला चे ठसे आढळून आले होते.

Img 20250103 Wa0009

वाघाचा तालुक्यात वावर असल्याचा दुजोरा वन विभागाने दिला असून शेतात जाणाऱ्या शेतकरी व शेतमजुरांना सतर्क राहण्याचा सूनचा देण्यात आल्या आहे. दि 10 सप्टेंबर ला सकाळी 11 वाजताचे सुमारास नवरगाव येथील शेतकरी देविदास आनंदराव बोन्डे यांच्या मालकीची गाय असून त्यांनी आज गायी चारणीसाठी गुराख्याकडे गाय सोडली व गुरख्याने  गावातील सर्व गायी जंगलाच्या दिशेने चारायला नेल्या होत्या.

नवरगाव येथील शेतकरी सचिन कुचनकार यांचे सुकनेगाव शिवारात असलेल्या शेताजवळ गायी चरत असताना वाघ आला व वाघाने गायीवर हल्ला चढवला यात गायीचा जागीच मृत्यू झाला गुराखी व शेतातील शेतकऱ्यांनी आरडा ओरड केल्याने वाघ गायीचा पडशा पाडून निघून गेला.  या परिसरात दर ५ ते ६ दिवसांनी जनावरांवर वाघाचे हल्ले होत असून या वाघाचा तात्काळ बंदोबस्त वनविभागाकडून करण्यात यावा अशी मागणी परिसरातील शेतकरी करीत आहे.