● उद्यानाचा लोकार्पण सोहळा
वणी:- नगर पालिकेच्या वतीने शहरात 1 कोटी 70 लाख रुपये खर्च करून अद्यावत उद्यान उभारण्यात आले आहे.या उद्यानाचा लोकार्पण सोहळा दि 1 ऑक्टोबर ला माजी मुख्यमंत्री तथा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.

वणी नगर पालिकेत भाजपची एक हाती सत्ता आहे. केंद्रात व मागील पंचवार्षिक मध्ये राज्यात भाजपची सत्ता असल्याने वणी शहराचा कायापालट करण्यात आला आहे. मागील पाच वर्षात कोट्यवधी चा निधी खेचून आणण्यात आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार व नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांना यश आले आहे.
शहरातील प्रभागात बगीचे उभारण्यात आले असून अंतर्गत रस्ते व भूमिगत गटारांची कामे मोठ्या प्रमाणात झाली आहे. रांगणा भुरकी घाटावरून शहरा पर्यंत टाकण्यात आलेली पाईप लाईन ही मोठी उपलब्धी ठरली आहे. शहरातील नागरिकांना विरंगुळा करण्याकरिता शहरात काहीच व्यवस्था नव्हती त्यामुळे गणेशपूर मार्गावर असलेल्या नेहरू पार्कच्या नूतनीकरणा चे काम पालिकेने हाती घेतले होते.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने उभारण्यात आलेल्या या उद्यानावर 1 कोटी 70 लाख चे वर खर्च करून सुशोभित करण्यात आले आहे.या उद्यानात लहान मुलांसाठी खेळणे, दोन पाण्याचे कारंजे, बसण्यासाठी व्यवस्था, फुल झाले, लॉन व आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे.
आता हे उद्यान नागरिकांना करिता खुले करण्यात येणार असून त्याचे लोकार्पण माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते दि 1 ऑक्टोबर ला होणार आहे. त्याकरिता देवींद्र फडणवीस वणी शहरात येत असल्याने त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे.