Home Breaking News …त्या गंभीर जखमी तरूणांचा अखेर मृत्यू

…त्या गंभीर जखमी तरूणांचा अखेर मृत्यू

1306

हत्‍येचा गुन्‍हा नोंद, संशयीतांस अटक

इंदिरा नगर परिसरात वास्‍तव्‍यास असलेल्‍या 28 वर्षीय तरूणाला दोघांनी जबर मारहाण केली. गंभीर जखमी झाल्‍यामुळे त्‍याला उपचारार्थ यवतमाळ येथील रूग्‍णांलयात दाखल करण्‍यात आले होते. त्‍याचा उपचारा दरम्‍यान दोन दिवसानंतर मृत्यू झाल्‍याने शहरात खळबळ माजली आहे. या प्रकरणी मारेगांव पोलीसांनी  हत्‍येचा गुन्‍हा नोंद केला आहे.

Img 20250422 wa0027

हर्षल लालसरे (22) असे अटकेतील आरोपींचे नांव आहे, तो इंदिरा नगर परिसरात वास्‍तव्‍यास असुन दि. 12 ऑक्‍टोबर ला राञी 8 वाजताच्‍या सुमारास मृतक संजय वाढई हा युवक हर्षल याचे घरा जवळून फिरत असतांना त्‍यांच्‍यात क्षुल्‍लक कारणांवरूण वाद उत्‍पन्‍न झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले, यावेळी दोघां भावंडानी त्याला जबर मारहाण केली होती.

Img 20250103 Wa0009

घटनेच्यावेळी संजय ला पोटावर मारहाण करण्‍यात आल्‍याने तो जागेवरच कोसळला. घटनास्‍थळी उपस्थित असलेल्‍यांनी तात्‍काळ संजयला दवाखान्‍यात हलवले. प्रकृती गंभीर असल्‍याने त्‍याला पुढील उपचारार्थ यवतमाळ ला हलविण्‍यात आले होते.

उपचारा दरम्‍यान संजयचा मृत्यू झाला असुन मारहाण करणाऱ्या संशयीतांना पोलीसांनी ताब्‍यात घेतले असुन त्‍यांचेवर हत्‍येचा गुन्‍हा नोंद करण्‍यात आला आहे. तर या प्रकरणी एका विधी संघर्षग्रस्‍ताला ताब्‍यात घेतले असुन पुढील तपास मारेंगांव पोलीस करीत आहे.

मारेगांव: सुमीत हेपट