Home Breaking News बंदचा आदेश असतांना ‘चक्क’ दारु विक्री

बंदचा आदेश असतांना ‘चक्क’ दारु विक्री

1948

पोलिसांची कारवाई, 6 लाखाचा मुद्देमाल हस्तगत

देवीच्या विसर्जनाची धामधूम सुरू असल्याने विसर्जन शांततेत पार पडावे या करिता वणी व शिरपूर पोलीस स्टेशन हद्दीतील अनुध्यप्त्या बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. तरी देखील दारु विक्री सुरु असल्याची गोपनीय माहिती मिळताच शिरपूर पोलिसांनी विदेशी दारू सह 6 लाख 28 हजार 110 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करत तिघांवर गुन्हा नोंद करून दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

शिरपूर चे ठाणेदार गजानन कडेवार यांनी शिरपूर पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व दारू दुकाने व अनुध्यप्त्या रविवार दि. 17 ऑक्टोबर ला बंद ठेवण्याचा आदेश पारित केला होता. तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी याकरिता ठिक ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

दारु तस्करी व अवैद्य वाहतूक करणारे काही महाभाग dry day च्या दिवशी मद्यपीचे चोचले पुरविण्यास अग्रेसर असतात. आबई फाट्यावर असलेल्या अश्वमेघ बार मधून विदेशी दारूचा साठा अवैद्यरित्या वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती ठाणेदार गजानन करेवाड यांना मिळाली.

पोलिसांनी सापळा रचून चारचाकी वाहन क्रमांक MH-34-AA- 5573 या वाहनाची तपासणी केली असता 28 हजार 110 रुपये किमतीचा विदेशी मद्य साठा आढळून आल्याने 6 लाख रुपये किमतीचे वाहन हस्तगत केले आहे.

या प्रकरणी शेख आरिफ शेख इब्राहिम (34) रा. कुरई, विलास नथु मालेकर (45) रा. सेलू यांना ताब्यात घेण्यात आले असून अनिल मासिरकर (40) रा. चारगाव यांचेवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पूजलवार यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार गजानन करेवाड, पोलीस उप निरीक्षक राम कांडूरे, दीपक गावंडे, प्रमोद जुणूनकर, अनिल सुरपाम, सुगत दिवेकर, अभिजित कोशटवार यांनी केली.
वणी: बातमीदार