Home Breaking News शेतातील बंड्यातून 20 क्विंटल कापसाची चोरी

शेतातील बंड्यातून 20 क्विंटल कापसाची चोरी

मालवाहू वाहनातून कापूस लंपास
नांदेपेरा येथील घटना

आधीच शेतकरी संकटात सापडला असतांना आता चोरांच नवं संकट त्यांच्या पुढे उभे झाले आहे. शेतातील बंड्यात असलेल्या 40 पैकी 20 क्विंटल कापूस मालवाहू वाहनातून चोरट्यांनी लंपास केल्याची घटना रविवारी उजेडात आली आहे.

नांदेपेरा येथील शेतकरी रवी जैस्वाल यांच्या शेतात कपाशी पिकाची लागवड केली होती. उत्पादनही चांगले झाले होते. कापसाचा भाव वाढत असल्याने दोन पैसे जास्त मिळतील म्हणून जैस्वाल यांनी शेतातील बंड्यात कापूस साठवून ठेवला होता.

रविवार दि. 5 डिसेंबर ला सकाळी नेहमी प्रमाणे गडी शेतात गेला असता त्याला कापसाची चोरी झाल्याचे निदर्शनास आले. 20 क्विंटल कापूस वाहनातून नेल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याबाबत जैस्वाल यांनी पोलिसांना माहिती देताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. यामध्ये शेतकऱ्याचे दीड लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
वणी: बातमीदार

Img 20250103 Wa0009
Previous articleट्रकची दुचाकीला धडक, दोन ठार
Next articleलसीकरण करा अन्यथा पालिकेत प्रवेश बंदी
Rokhthok News
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.