Home Breaking News अरेच्चा…मोबाईलचा स्फोट, अनर्थ टळला

अरेच्चा…मोबाईलचा स्फोट, अनर्थ टळला

1056

युवकाची सतर्कता

खिशात ठेवलेल्या मोबाईलचे चटके लागत असल्याने त्याने तो काढून बघितला. मोबाईल मधून ‘स्पार्क’ होत असल्या सारखा आवाज येताच त्याने सतर्कता बाळगत चटकन फेकला. मोबाईल खाली पडताच त्याचा जबर स्फोट झाला.

Img 20250422 wa0027

मारेगाव तालुक्यातील कुंभा गावात शनिवार दि. 30 ऑक्टोबरला मोबाईल स्फोटाची घटना घडली. काही काळ मोबाईल पँटच्या खिशातच मोबाईल असता तर अनर्थ घडला असता असे बोलल्या जात आहे.

Img 20250103 Wa0009

कुंभा येथील वासुदेव नागपुरे (25) या तरुणाने वणी वरून नामांकित कंपनी चा मोबाईल विकत घेतला होता. त्या मोबाईल ची बॅटरी खराब झाली असावी, मोबाईल वापरत असताना तो गरम होत होता. घटनेच्या दिवशी वासुदेव शेतात गेलेला असताना मोबाईल चे चटके लागल्यामुळे त्याने मोबाईल फेकला आणि क्षणात स्फोट झाला.

तरुणाईत मोबाईल चे आकर्षण कमालीचे वाढले आहे. त्यातच सतत होत असलेला वापर यामुळे बॅटरीची क्षमता संपुष्टात येत असून स्फोटाचे प्रमाण वाढताना दिसत आहे. अशा घटना घडूनये याकरिता मोबाईलचा वापर करताना काळजी घेणे गरजेचे झाले आहे.
कुंभा: बातमीदार