Home वणी परिसर राज्यव्यापी शहीद शेतकरी ‘कलश यात्रा’

राज्यव्यापी शहीद शेतकरी ‘कलश यात्रा’

290
C1 20241123 15111901

10 नोव्हेंबर ला यवतमाळ जिल्ह्यात
वणी, मारेगाव व पाटणबोरी येथे अभिवादन सभा

उत्तरप्रदेशात आंदोलनाच्या इतिहासातील ती अत्यंत काळीकुट्ट व निषेधार्थ घटना घडली होती. उन्माद चढलेल्यानी शेतकऱ्यांना चिरडले होते. त्या शहीद शेतकरी अस्थीकलशाचे स्वागत व अभिवादन कार्यक्रम यवतमाळ जिल्ह्यात दि. 10 नोव्हेंबर ला विविध ठिकाणी होणार आहे.

शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना भरधाव वाहनाने चिरडले होते. 4 शेतकरी व 1 पत्रकाराला आपला जीव गमवावा लागला. 12 पेक्षा अधिक शेतकऱ्यांना गंभीर जखमी झाले होते.

शहीद शेतकऱ्यांच्या अस्थीकलशाला अभिवादन करण्यासाठी राज्यव्यापी अस्थीकलश अभिवादन यात्रा 27 ऑक्टोबरला पुणे येथील क्रांतीज्योती महात्मा फुले वाड्यातून निघाली. 18 नोव्हेंबर ला मुंबई येथे हुतात्मा चौकात पोहोचणार आहे. ही अस्थीकलश यात्रा नांदेड जिल्ह्यातून यवतमाळ जिल्ह्यात पोहोचेल व इथून वर्धा जिल्ह्यात जाणार आहे.

यवतमाळ जिल्ह्यात दिनांक 10 नोव्हेंबर ला पाटणबोरी येथे दुपारी 11 वाजता बाजार चौकात, दुपारी 2 वाजता वणी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात व दुपारी 4 वाजता मारेगाव येथील मार्डी रोड शहीद भगतसिंग चौकात स्वागत अभिवादन सभा होणार आहे.

शाहिद शेतकरी अस्थीकलशाला अभिवादन करण्यासाठी जिल्ह्यातील समस्त शेतकरी, कामगार व सर्वसामान्य जनतेनी उपस्थित राहण्याचे आवाहन संयुक्त किसान मोर्चा कृती समिती व महाराष्ट्र राज्य किसान सभेने केले आहे.
वणी: बातमीदार