Home Breaking News माजी आमदार बोदकुरवार यांच्या हस्ते महाआरती

माजी आमदार बोदकुरवार यांच्या हस्ते महाआरती

● श्री छत्रपती दुर्गा उत्सव मंडळात मंगलमय वातावरण

C1 20250924 20370657
श्री छत्रपती दुर्गा उत्सव मंडळात मंगलमय वातावरण

शहरातील श्री छत्रपती दुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने आयोजित धार्मिक कार्यक्रमांतर्गत विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार व ललिताताई बोदकुरवार या मान्यवर दाम्पत्याच्या हस्ते मंगलमय वातावरणात महाआरती पार पडली. Maha Aarti performed by former MLA Bodkurwar

श्री छत्रपती दुर्गा उत्सव मंडळात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून मंडळाच्या वतीने दररोज भाविकांना शाबूदाण्याची उसळ प्रसादरूपाने दिली जात आहे.

IMG 20260511 WA0005

कार्यक्रमावेळी श्री छत्रपती दुर्गा उत्सव मंडळाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे उपस्थित होते. मंडळाच्या कार्यकारिणीत अध्यक्ष प्रणव पिंपळे, उपाध्यक्ष श्रेयश हरणे, सचिव निखिल झट्टे यांच्यासह अक्षय ऐकरे, अक्षय बोकडे, आशिष डंभारे, शुभम इंगळे, पंकज कासावार, रोहन शिरभाते, मयूर मेहता, विनोद पायघन, पियुष चौव्हान, वेदांत काळे, तन्मय ढुमने, भार्गव काळे, प्रशांत धपके, सूरज नारडेवार, प्रथमेश पाटील, मयूर रोगे, मिहिर काकडे व आयुष निमजे यांचा सक्रिय सहभाग होता.

Img 20250103 Wa0009

भाविकांच्या उपस्थितीत भक्तिरसात न्हाऊन निघालेल्या या महाआरतीने परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले.
Rokhthok