Home क्राईम ‘अतुल’ च्या हत्येत प्रेयसीच्या बापाचा ‘सहभाग’

‘अतुल’ च्या हत्येत प्रेयसीच्या बापाचा ‘सहभाग’

799

आरोपीची संख्या झाली चार

वणी: राजूर कॉलरीतील चूनाभट्टीत काम करणाऱ्या अतुल खोब्रागडे (39) यांची गळा आवळून हत्या करण्यात आली होती. 20 डिसेंबरला सकाळी साडेसात वाजताचे सुमारास उघडकीस आलेल्या घटनेत वणी पोलिसांनी प्रेयसी व तिच्या बहीण जावयाला ताब्यात घेत पोलीस कोठडी मिळवली. तपासात प्रेयसीच्या बापाचा ‘सहभाग’ असल्याचे निष्पन्न झाल्याने आता आरोपीची संख्या चार झाली आहे.

प्रेयसी सोनू सरवणे, हर्षद जाधव, राजेश वाघमारे, शंकर वरगणे असे अटकेतील आरोपीची नावे आहेत. सोनू ही अतुलची प्रेयसी होती तिला उधार दिलेल्या पैशाची मागणी मृतक अतुल करत होता. रविवारी तो पुन्हा सोनू कडे गेला यावेळी दोघांत वाद निर्माण झाला या दरम्यान सोनुने बहीण जावई हर्षद ला बोलावले.

तिघांत सुरू असलेल्या वादात तोडगा निघत नसल्याने सोनुने वडील राजेश वाघमारे (41)रा. मदना ता.आर्वी जिल्हा वर्धा यांना बोलावले. तो सहकारी शंकर वरगणे (38) रा. मदना ता.आर्वी जिल्हा वर्धा यांच्यासह खाजगी वाहनाने सायंकाळी राजूर कॉलरी ला पोहचलेत.

मृतक अतुल व प्रेयसी सोनू यांच्यातील वाढत चाललेला वाद त्या दोघांच्या “एन्ट्री’ नंतर चांगलाच उफाळला. शाब्दिक वादाचे रूपांतर घातक वळणावर आले. उपस्थित मारेकऱ्यांपैकी एकाने हात तर दुसऱ्याने अतुलचे पाय पकडले आणि बाकीच्यांनी गळा आवळला.

अतुलचा गेम झाल्यानंतर त्या चौघांनी रात्री उशिरा मृतदेह घराच्या बाहेर आणून टाकला आणि आपापल्या गावी पोबारा केला. दुसऱ्या दिवशी सकाळी घटना उघडकीस आली आणि चांगलीच खळबळ माजली होती.

घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुजलवार यांचे मार्गदर्शनात शाम सोनटक्के, सहायक पोलीस निरीक्षक माया चाटसे, शिवाजी टिपूर्णे यांनी आरंभला. घटनास्थळावरील निरीक्षण व परिस्थितीजन्य पुराव्यावरून पोलिसांनी प्रेयसी सोनू व तिचा बहीण जावई हर्षद ला ताब्यात घेतले. पुढील तपासात पुन्हा दोघांचा सहभाग निष्पन्न झाल्याने आता आरोपींची संख्या 4 झाली आहे.
वणी: बातमीदार