● 25 जनावरांची सुटका,
● 42 लाखाचा मुद्देमाल हस्तगत
वणी: शिरपूर पोलीस स्टेशन हद्दीतून अवैद्यरित्या गोवंशाची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती ठाणेदार गजानन करेवाड यांना मिळाली. रविवार दि. 23 जानेवारीला रात्री पोलीस पथकासह सापळा रचला असता 8 वाहनात निर्दयीपणे कोंबलेली जनावरे आढळून आली. याप्रकरणी 9 आरोपीला ताब्यात घेत 42 लाख 47 हजाराचा मुद्देमाल हस्तगत करून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

वणी व शिरपूर पोलीस स्टेशन हद्दीतील महामार्गावरुन गोवंशाची तस्करी करण्यात येते. नागपूर, छत्तीसगड भागातून तेलंगणा व आंध्रप्रदेशात जनावरांना निर्दयीपणे कोंबून अवैद्य वाहतूक सातत्याने होत असल्याचे यापूर्वी उघड झाले आहे. यावर आळा घालण्यासाठी वणी व शिरपूर पोलिसांनी वारंवार गोवंश तस्करांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
ठाणेदार गजानन करेवाड यांना गोपनीय माहिती मीळाली की काही ईसम हे छोट्या पिकअप वाहनातून अवैधरित्या जनावाराची कत्तली करिता कायर व शिरपुर मार्गावरून अदीलाबाद कडे अवैद्य वाहतूक करणार आहेत. यामुळे पीएसआय रामेश्वर कांडुरे व दोन पथकासह वेशांतर चेंडकापूर फाटा व शिरपूर बसस्थानक परिसरात सापळा रचला.
चेंडकापुर फाटा परिसरातून सहा वाहने व दोन वाहने शिरपूर बस स्थानक जवळ अडविण्यात आले. यावेळी 7 महिंद्रा पिकअप वाहन व एक टाटाचा लहान पिकअप मध्ये क्षमतेपेक्षा जास्त जनावरे डांबुन निर्दयपणे, उपासीपोटी बांधून वाहतुक करीत असतांना मिळून आले. वाहानातील चालकांन विचारणा केली असता उडवा-उडवीची उत्तरे दिली.
यावेळी अनिल देवीदास आत्राम (27) रा. कायर, सचिन महादेव थेरे (38) रा. कुंड्रा, अमीत गजानन पोट (21) रा. सुरला, अफनल बेग अफसर बैग (36) रा. कायर, भोलाराम सुरेश पडोळे (25)रा. डोर्ली, विश्वजीत विलास ताजने (25)रा. बाबापूर, भारत पिंदुरकर (28) रा. सुरला ता. वरोरा जिल्हा चंद्रपूर, नितीन राजेंद्र नरोटे (27) ऐरव्हा पो. स्टे भारी ता. जिवती जिल्हा चंद्रपूर, बालाजी थोरात (27) रा. डोगरगांव पाटण ता. झरी यांना ताब्यात घेत आठ पिकअप वाहने व त्यात लहान-मोठी 25 गोवंश नातीचे जनावरे असा एकूण 42 लाख 47 हजार चा मुद्देमाल हस्तगत करून गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील-भुजबळ, अप्पर पोलीस अधीक्षक खडेराव धरणे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुजलवार यांचे मार्गदर्शनात ठाणेदार सपोनि गजानन करेवाड, पीएसआय रामेश्वर कांदुरे, प्रविण गायकवाड, गंगाधर घोडाम, सुगत दिवेकर, गजानन सावसाकडे, सुनिल दुबे, अमोल कोवे, निलेश भुसे, विनोद मोतराव, विनोद काकडे, राहुल बाडे, पल्लवी बल्की सर्व यांनी केली.
वणी: बातमीदार