Home वणी परिसर शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी भाजपा आक्रमक

शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी भाजपा आक्रमक

382

आ. बोदकुरवार यांच्या नेतृत्वात गांव तिथे उपोषण

वणी: वणी विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी, अतिवृष्टीच्या मदतीपासुन वंचित सात मंडळाचा समावेश करण्यासाठी, भारतीय जनता पार्टी वणी, मारेगांव व झरी तालुक्यामध्ये 120 गावात आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या नेतृत्वात उपोषण करण्यात आले.

माहे ऑगस्ट, सप्टेंबर मध्ये वणी विधानसभा क्षेत्रात संततधार पाऊस पडला. या परिसरातील प्रत्येक शेतकऱ्यांच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले. परंतु शासनाने अतिवृष्टीचे मापन करण्यासाठी जे यंत्र लावून गणना करण्यात आली ती पूर्णपणे सदोष आहे. या सदोष यंत्रणेमुळे येथील 7 मंडळातील जवळजवळ 150 गावातील शेतकरी अतिवृष्टीच्या लाभापासून वंचित आहेत.

या गावातील शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान होऊनही महाविकास आघाडीचे शासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. त्यासोबत रब्बी हंगामात पिकांना ओलितासाठी पाणी देण्याच्या काळात विद्युत विभाग थकीत वीज देयके असलेल्या शेतकऱ्यांचे कृषी पंप वीज जबरदस्तीने तोडणे सुरू केले आहे. शेतकऱ्यावर अस्मानी संकटासोबत शासनाच्या सुलतानी कारभारामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

या संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्यासाठी वणी, मारेगाव व झरी या तीन तालुक्यातील 7 मंडळातील 120 गावात आ. संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले आहे.

याप्रसंगी तारेंद्र बोर्डे, रवी बेलूरकर, विजय पिदूरकर, संजय पिंपळशेंडे, दिनकर पावडे, गजानन विधाते, मंगला पावडे, मंगला ठाकरे, विजय गारघाटे, विजय झाडे, धनराज राजगडकर, शंकर बांदुरकर, अशोक सुर, मंजुभाऊ डंभारे, सचिन खाडे, दिपक पाऊणकर, विठ्ठल कोडापे, वैभव कैवरासे व भाजपा शक्ती केंद्र प्रमुख व बुथ प्रमुख या आंदोलनात सहभागी झाले होते.
वणी: बातमीदार