Home Breaking News त्या….अधिकाऱ्यांना राष्ट्रवादीने पाठवल्या ‘बांगड्या’

त्या….अधिकाऱ्यांना राष्ट्रवादीने पाठवल्या ‘बांगड्या’

537

मलिक यांच्या अटकेचे पडसाद

वणी: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक यांना ईडी कडून अटक करण्यात आली. याचे पडसाद वणीत उमटले असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांना चक्क..बांगड्या पाठवल्या आहेत. राजकीय द्वेषापोटी केलेली कारवाई लोकशाही ला घातक असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस स्वप्नील धुर्वे यांनी केला असून SDO डॉ. शरद जावळे यांना निवेदन देत निषेध व्यक्त केला.

Img 20250422 wa0027

केंद्र सरकारच्या वित्त विभागा अंतर्गत येत असलेले अंमलबजावणी संचालनालय (ई.डी) मधील अधिकारी विरोधकांना ‘टार्गेट’ करत आहे. दि 23 फेब्रुवारीला राज्याचे मंत्री नवाब मलिक यांचेवर मणी लॉन्ड्रीग चा आरोप करत हेतुपरस्पर अटक केली.

Img 20250103 Wa0009

महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्या करीता केन्द्र सरकार ई.डी ला हाताशी धरुन राज्यातील मंत्र्यांना बदनाम करायचे काम करत आहे. ईडी मधील सनदी अधिकारी हे केन्द्र सरकार चे बाहुले आहेत. असा आरोप राष्ट्रवादी चे जिल्हा सरचिटणीस स्वप्नील धुर्वे यांनी निवेदनातून केला आहे.

निवेदन सादर करण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पोस्टाद्वारे ईडी च्या अधिकाऱ्यांकरिता बांगड्या पाठवल्या आहेत. यावेळी सुर्यकांत खाडे, विजय नगराळे, तालुकाध्यक्ष हेमंत गावंडे, शहराध्यक्ष मनोज वाकटी, राजु उपरकार, गुणवंत टोंगे, रामकृष्ण वैद्य, वैशाली तायडे, नागभीडकर, प्रणय बल्की, बंटी प्रेमकुंटावार, सचिन वालदे, जयस्वाल, सचीन चव्हाण, प्रणय बल्की, अनिकेत थेरे, समीर भादंकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
वणी: बातमीदार