● वाघाने पाडला गोऱ्याचा फडशा
● धाबापूर शिवारातील घटना
वणी:– तालुक्यात वाघाचा मुक्तसंचार कमालीचा वाढला आहे. मागील अनेक महिन्यांपासून पाळीव प्राण्यावर हल्ले होत असताना ग्रामीण भागात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. मंगळवार दि. 1 मार्च ला धाबापूर शेत शिवारातील चराईसाठी गेलेल्या जनावरावर वाघाने हल्ला करून ठार केले आहे.

वणी तालुक्यात सध्या दोन वाघाचा वावर दिसून येत आहे. रासा, कोरंबी मारेगाव, उकणी व निलजई या परिसरात अनेकांना वाघाचे दर्शन झाले आहे. तर रासा, घोन्सा परिसरात अनेक जनावरांवर हल्ले चढवून पाळीव प्राण्यांना ठार केल्याच्या घटना घडल्या आहेत.
चिखलगाव येथील पांढुरंग अतकरे यांचे धाबापूर शिवारात शेत आहे. दि 1मार्चला सायंकाळी 5 वाजताचे सुमारास त्यांच्या मालकीचा शेतात चरत असलेल्या गोऱ्या ला वाघाने भक्ष्य बनवले. यापूर्वी सुध्दा याच शेतकऱ्याचे दोन जनावरे वाघाने ठार केले होते. सतत जनावरांवर सुरू असलेल्या हल्या मुळे शेतकरी व शेतमजुरां मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वणी : बातमीदार