Home Breaking News वेकोलीत कार्यरत महिलेची महाप्रबंधक यांच्या विरोधात पोलिसात तक्रार

वेकोलीत कार्यरत महिलेची महाप्रबंधक यांच्या विरोधात पोलिसात तक्रार

2346
Img 20240930 Wa0028

● शारीरिक, मानसिक छळ करत असल्याचा आरोप

वणी: वेकोलीच्या वणी उत्तर क्षेत्रात भालर येथील प्रशासकीय कार्यालयात आवक-जावक लिपिक असलेल्या महिलेने उप महाप्रबंधक सुनीलकुमार हे शारीरिक, मानसिक व आर्थिक छळ करत असल्याची तक्रार बुधवार दि. 6 एप्रिलला दुपारी शिरपूर ठाण्यात दिली. वेकोलीत कार्यरत महिलेनेच वरिष्ठ अधिकाऱ्यांची ‘पोलखोल’ केल्याने खळबळ माजली आहे.

भालर येथील वेकोलीच्या प्रशासकीय कार्यालयात कर्तव्यावर असलेल्या महिलेने वरिष्ठ अधिकाऱ्यावर गंभीर आरोप केले आहेत. GM सुनीलकुमार व PM राजकुमार शर्मा हे कार्यालयीन कामावर असताना शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रास देत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

ती कामचुकार कर्मचारी आहे ●

ती महिला कर्मचारी राजूर येथे कार्यरत होती, अतिशय कामचुकार आहे, कोणतेही कार्यलयीन काम करत नाही. तिच्या विरोधात अनेक तक्रारी प्राप्त झाले आहेत. चार महिण्यापूर्वी तिने वणी पोलिसात सुद्धा तक्रार केली होती, त्यात चौकशी झाली आहे. मी स्वतः न्यायप्रिय असून अशा तक्रारीला घाबरत नाही. तसेच तिच्या बाबत विस्तृत माहिती संकलित करून सत्य ते लिहावे.
सुनीलकुमार
उप महाप्रबंधक
वणी उत्तर क्षेत्र, भालर

पाच महिण्यापूर्वी भांदेवाडा येथून भालर कार्यालयात बदलून आल्यापासून सातत्याने अपमान करणे, नजर ठेवणे व शिवीगाळ करत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. 25 डिसेंबर 2021 ला GM यांना त्यांच्या कार्यालयात भेटण्यासाठी गेलेली असताना त्यांनी अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत अपमानित केले व सुरक्षा रक्षकाला बोलावून हाकलून दिल्याचा गंभीर खुलासा तक्रारीतून केला आहे.

जीविताला धोका झाल्यास GM सुनीलकुमार व PM राजकुमार शर्मा यांना जबाबदार धरण्यात यावे असे त्या वेकोलीत कार्यरत महिलेने तक्रारीत नमूद केल्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. शिरपूर पोलीसांनी अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही मात्र तपसांती काय निष्पन्न होणार याकडे लक्ष लागले आहे.

महिलेची तक्रार प्राप्त झाली आहे परंतु तिने ती तक्रार सर्वसमावेशक महिलांच्या बाबतीत दिली आहे. मानसिक, शारीरिक असे तक्रारीत नमूद करण्यात आले असले तरी त्यातून नेमका अर्थ उलगडत नाही. मात्र या प्रकरणी योग्य तपास व चौकशी केल्यानंतर तिला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल.
गजानन करेवाड
ठाणेदार, शिरपूर पोलीस ठाणे
वणी: बातमीदार