Home Breaking News आज मनसेचा ताफा निघणार संभाजीनगरच्या दिशेने

आज मनसेचा ताफा निघणार संभाजीनगरच्या दिशेने

हजारो मनसैनिक सज्ज
‘राज’सभेची उत्सुकता शिगेला

वणी: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र दिनी संभाजीनगर (Aurangabad) ला सभा घेण्याचे जाहीर केले. संपूर्ण देशात राज’सभेची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. सभेला हजर राहण्यासाठी राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी जय्यत तयारी केली असून ट्रॅव्हल्स तसेच चारचाकी वाहनातून हजारो मनसैनिकांचा ताफा शनिवारी सायंकाळी संभाजीनगरच्या दिशेने रवाना होणार आहे.

मागील काही दिवसांपासून मशिदींवरील भोंग्यांविरोधात मनसेने आक्रमक पवित्र घेतला आहे. मशिदींवरील भोंगे उतरविण्यासाठी मनसेने राज्य सरकारला 3 मेचा अल्टिमेटम दिला आहे. त्यामुळे सध्या राज्यात हिंदुत्वाच्या मुद्यावरून राजकारण चांगलेच तापले आहे.

राज ठाकरे यांनी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून संभाजीनगर ला जाहीर सभा घेण्याचे जाहीर केले होते. यामुळे बरेच वादंग निर्माण झाले होते. सभा घेणारच या भूमिकेवर मनसे ठाम होती. त्यातच राज्यात अराजकता निर्माण होवू नये याकरिता राज्य सरकारने अटी व शर्थी लादून सभेला परवानगी दिली आहे.

Img 20250103 Wa0009

‘राज’सभेची उत्सुकता शिगेला पोहोचली असून वणी विधानसभा क्षेत्रातून उंबरकर यांच्या नेतृत्वाखाली हजारो महाराष्ट्र सैनिक शनिवारी सायंकाळी संभाजीनगरच्या दिशेने रवाना होणार आहे. याकरिता अकरा ट्रॅव्हल्स, अनेक चारचाकी वाहने सज्ज ठेवण्यात आली आहे.
वणी: बातमीदार